मुंबई : स्वयंघोषित (Self-proclaimed) चित्रपट समिक्षक ( film critic) आणि अभिनेता (Actor) कमाल आर.खान (Kamal R. Khan) नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत असतो. या ट्विट्समुळे तो याआधीही अनेकदा वादात सापडला होता. आता दोन वर्षांपूर्वीच्या एका वादग्रस्ट ट्विटमुळे (Tweet) त्याला पोलिसांनी अटक केली. मालाड पोलिसांनी (Malad Police) मुंबई विमानतळावरच (Mumbai Airport ) पोलिसांनी केआरकेला अटक केली असून त्याला बोरिवली कोर्टात (Borivali Court) हजर केलं जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. (Kamal R.Khan arrested by Mumbai police in the controversial tweet case )
कमाल आर. खानने 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. केआरकेने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचा अतिशय नकारात्मक रिव्ह्यू दिला होता. याशिवाय त्यांनी आमिर खानवरही निशाणा साधला. पीके सिनेमावर केआरकेने समीक्षा केली होती, त्यावेळीही अमिर खानवर टीका केली होती.
त्यानंतर ट्विटरने त्याचे अकाउंट बंद केलं होतं. दरम्यान, वादग्रस्त समीक्षा करण्याशिवाय कमाल आर खान यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने 2005 मध्ये 'सितम' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.
Read Also : ST कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या! परिवहन खात्याला सूचना
केआरके अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो अनेकदा आपल्या वादग्रस्त ट्विटच्या माध्यमातून चर्चेत असतो. तो सतत बॉलीवूडला टार्गेट करत राहतो. केआरके नेहमीच कोणत्याही चित्रपटावर आणि कलाकारांवर भाष्य करत असतो. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांना केआरकेने आपल्या समीक्षा व्हिडिओमधून बरे-वाईट म्हटले आहे.
Read Also : हरितालिकाचे व्रत करताना चुका केल्यास नाही मिळणार फळ
केआरके कायदेशीर अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलिवूडच्या दबंग खानने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. केआरकेने सलमान खानच्या राधे या चित्रपटाचा नकारात्मक रिव्ह्यू दिला, तसेच त्याने सलमान खानवर वैयक्तिक टिप्पणीही केली, त्यानंतर सलमान खानने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.