कंगना राणावत आणि रंगोलीला हायकोर्टाकडून दिलासा, ११ जानेवारीला होणार सुनावणी

बी टाऊन
Updated Nov 24, 2020 | 21:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून द्वेष पसरवल्याप्रकरणी आणि राजद्रोह प्रकरणात कंगना राणावतला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने पोलिसांना आदेश दिलेत की दोघांविरोधात कोणतीही कारवाई करू नये.

kangana ranaut
कंगना राणावत आणि रंगोलीला हायकोर्टाकडून दिलासा 

थोडं पण कामाचं

  • राजद्रोह प्रकरणात कंगना राणावतला कोर्टाकडून दिलासा
  • कोर्टाचे पोलिसांना आदेश दोघांविरोधात कोणतीही कारवाई नको
  • आता ८ जानेवारीला हजर होणार कंगना-रंगोली, ११ जानेवारीला सुनावणी

मुंबई: सोशल मीडिया पोस्टच्या(social media post) माध्यमातून समाजामध्ये द्वेष पसरवल्याप्रकरणी आणि राजद्रोह प्रकरणात कंगना राणावतला(kangana ranaut) हायकोर्टाने(bombay highcourt) दिलासा दिला आहे. मंगळवारी कंगना राणावतच्या याचिकेवर सुनावणी झाली. यात बॉम्बे हायकोर्टाने कंगना राणावतविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या मुंबई पोलिसांची मागणी फेटाळून लावली. कंगनाला अनेकदा मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले होते. मात्र ती प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या कारणाने टाळत होती. दरम्यान, कोर्टाने दोघांना ८ जानेवारीला मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. 

तोपर्यत कंगना आणि तिची बहीण रंगोली यांचा अटकेपासून बचाव झाला आहे. आता कोर्टाची सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेलने सोमवारी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करत एफआयआर रद्द करण्याचे अपील केले होते. कंगनाच्या वकीलांकडून अपील करण्यात आले होते की चौकशीसाठी पोलिसांकडून समन्सही रोखले जावेत. यासोबतच पोलिसांना आदेश देण्यात आलेत की त्यांच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाऊ नये. मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोलीला तिसऱ्यांदा समन्स जारी केले होते. 

हे आहे पूर्ण प्रकरण

कंगना आणि रंगोलीविरोधात कथितपणे धार्मिक भेदभाव पसरल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार 153A, 295A आणि 124-A अंतर्गत तक्रार दाखल केली होती. मुन्ना वराली आणि साहिल अश्रफ सय्यद नावाच्या याचिकाकर्त्यांनी कोर्टामध्ये कंगनाचे ट्वीट हे भडकावल्यासारखे असल्याचे सांगत याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. या याचिकेत आरोप लगावण्यात आला होता की कंगना राणावतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्वीट करत तसेच विविध टीव्ही चॅनेल्सला दिलेल्या मुलाखतीत हिंदी आणि मुस्लिम कलाकारांना वेगवेगळे करत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी