Kangana Ranavat strech marks: स्ट्रेच मार्क्स हे सामान्यतः पोस्ट-प्रेग्नेंसी स्कार्स म्हणून ओळखले जातात. केवळ सामान्य मुलीच नाही तर अनेक चित्रपट अभिनेत्रीही याला घाबरतात आणि याकडे डाग म्हणून पाहतात. अलीकडेच अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या एका पोस्टमध्ये सांगितले आहे की "थलाईवी" साठी वजन वाढल्यामुळे आणि नंतर कमी झाल्यामुळे तिच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स आले आहेत.
त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, स्ट्रेच मार्क्स केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होतात. यामध्ये त्वचा ताणली जाते आणि शरीरावर कधीही न जाणाऱ्या खुणा राहतात. हे डाग कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत, तसेच तेलही उपलब्ध असले तरी त्यांचा योग्य वेळी वापर करणे आवश्यक आहे.
अधिक वाचा : या ४ गोष्टी खाल्ल्याने शुक्राणूंच्या संख्येत होते वाढ
पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये स्ट्रेच मार्क्स जास्त आढळतात. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की स्ट्रेच मार्क्स येण्यात जीन्सचीही भूमिका महत्त्वाची असते. विशेषत: गरोदरपणात ४० टक्के महिलांमध्ये दिसणारे स्ट्रेच मार्क्स हे अनुवांशिक असतात. याशिवाय ज्या महिलांचा रंग गोरा असतो, त्यांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स अधिक सहज दिसतात.
कुशिंग सिंड्रोम, जेव्हा शरीरात कॉर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण जास्त असते किंवा एहलर्स-डॅनलॉस सिंड्रोम,ज्यामध्ये त्वचा सहजपणे पसरते. यामुळे शरीरात जास्त स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
हे शरीराच्या कोणत्याही भागात त्वचेच्या जास्त ताणल्यामुळे उद्भवतात. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की काही औषधे,जिम,बॉडी बिल्डिंग,लठ्ठपणा किंवा गर्भधारणा.
मात्र, बहुतांश महिला त्यासाठी काहीही करण्याऐवजी लपवून ठेवतात. अशा अनेक महिला किंवा मुली आहेत ज्यांना याबद्दल उघडपणे बोलता येत नाही आणि त्यांना स्ट्रेच मार्क्स आहेत हे मानण्यास त्या नकार देतात,तर अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की 90 टक्के महिलांच्या शरीरावर हे मार्क्स आहेत.
अधिक वाचा : विदर्भात २७ जूनपासून उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा
स्ट्रेच मार्क्स काय आहेत
हे त्वचेच्या टिश्यूचा एक प्रकार आहेत,जे त्वचेच्या जास्त ताणल्यामुळे तयार होतात. कोणत्याही शारीरिक बदलामुळे किंवा वैद्यकीय कारणामुळे त्वचा ताणली जाते तेव्हा त्वचेच्या पृष्ठभागाखाली असलेले तंतू तुटतात,ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स होतात. स्ट्रेच मार्क्स दिसण्यापूर्वी, त्वचा पातळ आणि गुलाबी दिसते, ज्यामुळे जळजळ किंवा खाज सुटू शकते.
नंतर त्वचेवर ताण पडल्यामुळे हे स्ट्रेच मार्क्स वाढू शकतात. लाल स्ट्रेच मार्क्सवर उपचार करणे सोपे आहे.हे क्रीम लावून दुरुस्त केले जाऊ शकते. पांढरे स्ट्रेच मार्क्स हे जुने मार्क्स आहेत.त्यात टिश्यूचे चट्टे जास्त आहेत,त्यामुळे ते बरे करणे कठीण आहे.
स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी काही खबरदारी घेतली जाऊ शकते. स्तन,पोट,हात,कंबर अशा शरीराच्या काही भागांवर खाज येत असेल तर कोणत्याही कठीण वस्तूने किंवा नखेने ओरबाडणे टाळावे. त्वचा हायड्रेटेड ठेवा आणि कॉर्टिकोस्टेरॉईड गोळ्यांचा वापर टाळा. त्याच वेळी, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच क्रीम वापरा. सुरुवातीला,कोरफड आणि एरंडेल तेल सारख्या घरगुती गोष्टी वापरा जेणेकरून हळूहळू हे स्ट्रेच मार्क्स कमी होतील.