कंगनाने पुन्हा उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा, केले पुन्हा वादग्रस्त ट्विट

अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

Kangana lashes out uddhav thackeray
कंगनाने पुन्हा उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा 

थोडं पण कामाचं

  • सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री : मुंबईत हा कसला गुंडाराज सुरू आहे ? कंगनाने केले ट्विट
  • साहिल चौधरीला अटक केलेली बातमी शेअर करत कंगना ट्विट केले
  • अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.  मुंबईमध्ये गुंडाराज सुरू असल्याचे म्हणून तिने उद्धव ठाकरे हे ‘जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री’ असल्याचा पुन्हा हल्ला चढवला.  हरियाणातील युट्यूबर साहिल चौधरीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर कंगनाने राज्य सरकारवर पुन्हा टीकेची झोड उठवली आहे. यापूर्वी मुंबईची तुलना तीने पाक व्याप्त काश्मिराशी केली होती. 

नेमकं काय म्हटलं ट्विटमध्ये 

साहिल चौधरीला अटक केलेली बातमी शेअर करत कंगना ट्विट केले की, मुंबईत हा कसला गुंडाराज सुरू आहे ? कोणीही जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला प्रश्न विचारू शकत नाही? ते आपल्यासोबत काय करतील ? आपली घरे तोडतील आणि ठार करतील ? काँग्रेस यासाठी कोण उत्तरदायी आहे ?

हे सर्व काय आहे ?

साहिल चौधरीच्या अटकेबाबत प्रश्न विचारत, कंगनाने अनुराग कश्यपवर देखील निशाणा साधला. कंगना म्हणाली की, महाराष्ट्र सरकारच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर कोणतीही व्यक्ती अचानक साहिलच्या विरोधात एफआयआर दाखल करते आणि साहिलला तात्काळ जेलमध्ये पाठवले जाते. मात्र पायल घोषने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल करून अनेक दिवस झाले तरीही तो सहज फिरत आहे. हे सर्व काय आहे ? असा प्रश्न उपस्थित करून कंगनाने काँग्रेसला टॅग केले आहे. 

अनुराग कश्यपविरोधात कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा

दरम्यान, पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचे आरोप केले आहे. त्याच्याविरोधात कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा देखील तिने दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी