राजकारणातील प्रवेशावर कंगना राणावतनं दिलं उत्तर; म्हणाली, ''माझ्याकडे असे काय...''

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jul 05, 2022 | 14:31 IST

कंगना राजकारणात प्रवेश करणार का?, या प्रश्नाचं उत्तर लोकांना जाणून घ्यायचं आहे. आता कंगनानं राजकारण यायचं की नाही यावर उत्तर दिलं आहे.

Kangana Ranaut
कंगना राणावत 
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे.
  • कंगना बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीही करत आहे.
  • आता कंगनानं राजकारण यायचं की नाही यावर उत्तर दिलं आहे.


मुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून अभिनेत्री कंगना राणावत राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगू लागली आहे. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे. मात्र कंगना बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीही करत आहे. असं असताना देखील कंगना राजकारणात प्रवेश करणार का?, या प्रश्नाचं उत्तर लोकांना जाणून घ्यायचं आहे. 
महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या काळात कंगनानं केलेलं राजकारण कोणापासून लपलेला नाही. पण आता कंगनानं राजकारण यायचं की नाही यावर उत्तर दिलं आहे. 

लोकांची इच्छा असेल तर मी राजकारणात प्रवेश करेन, असं कंगनानं म्हटलं आहे. एकदा ती म्हणाली होती की, मी राजकारणात येईन की नाही माहीत नाही. पण कोरोनापूर्वी 2019 पर्यंत ती स्पष्ट होती की तिला राजकारणात यायचं नाही. कंगनाला सिनेसृष्टीत जवळपास 18 वर्षे झाली आहेत. सिनेमांनी तिला सर्व काही दिले आहे. 

कंगनाच्या मते राजकारणाचा अर्थ काय? 

2019 मध्ये कंगनानं 'जजमेंटल है क्या' सिनेमादरम्यान, तिनं या विषयावर एक मनोरंजक मुद्दा मांडला होता. त्यावेळी कंगना म्हणाली होती की, राजकारण मला काय देऊ शकते, जे आज माझ्याकडे नाही. मला राजकारणी बनण्याची गरज का आहे हे मला समजत नाही. प्रत्येकानं आपल्या देशालाच जोडून राहावं. लोकांची समजूत आहे की, मी देशाबद्दल बोललो तर मला यापेक्षा काहीतरी मोठं नक्कीच हवं आहे. पण राजकारणात जाणे म्हणजे तुमच्या कपाळावर फक्त एकाच राजकीय पक्षाचा शिक्का बसेल बाकी काही नाही.

अधिक वाचा- मुंबईत धो-धो पाऊस कोसळतोय, पटकन पाहून घ्या लोकल ट्रेनचं Status

राजकारणावर कंगनाचं स्पष्ट मत

त्यावेळी कंगनानं राजकारणावर स्पष्ट म्हटलं होतं की, राजकारण मला काय देऊ शकतं. आज मी बॉलिवूडमधली सर्वात महागडी हिरोईन आहे आणि जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स करते तेव्हा आजूबाजूला तीस कॅमेरे असतात. आजही मला हवे असेल तर मी माझी गोष्ट संपूर्ण देशाला सांगू शकते. म्हणूनच माझा जनतेला प्रश्न आहे की, आज माझ्याकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही आणि ते मी राजकारणात प्रवेश केल्यानंतर मिळवेन.

अधिक वाचा- नीता आणि मुकेश अंबानी यांची सुंदर Lovestory

कंगनाचे अपकमिंग फिल्म 

कंगनाचा 'धाकड' बॉक्स हा सिनेमा ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. मात्र 2022 आणि 2023 मध्ये तिचे काही मोठे सिनेमे पाईमपाईनमध्ये आहेत. सध्या ती 'इमर्जन्सी' या सिनेमात काम करत आहे. ती या सिनेमाची निर्माती-दिग्दर्शिकही आहे. यावर्षी तिचा तेजस हा सिनेमा ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  नवाजुद्दीन सिद्दीकी तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या टिकू वेड्स शेरूमध्ये दिसणार आहे. कंगना सीता: द इन्कारनेशन आणि दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या पुढच्या सिनेमाचीही तयारी करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी