Kangana Ranaut Wedding: कंगना राणावतने केला मोठा खुलासा, सांगितले लग्न न होण्याचे कारण

बी टाऊन
Updated May 12, 2022 | 14:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kangana Ranaut Talk about her Wedding । कंगना राणावतच्या 'धाकड' चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. कंगना राणावत आणि अर्जुन रामपाल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात झळकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.

Kangana Ranaut reveals that her marriage does not happen due to these rumors
कंगना राणावतने केला खुलासा, सांगितले लग्न न होण्याचे कारण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कंगना राणावतच्या 'धाकड' चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे.
  • माझ्याविरूद्धच्या अफवांमुळे माझे लग्न होत नाही - कंगना
  • 'मी मुलांना मारते' अशी अफवा पसरवली जाते.

Kangana Ranaut Talk about her Wedding । मुंबई : कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhakad) चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. कंगना राणावत आणि अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात झळकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. दरम्यान चित्रपटांव्यतिरिक्त कंगना तिच्या वेगळ्या शैलीसाठी देखील नेहमी चर्चेत असते. ती कोणत्याही मुद्द्यावर बोलायला कमी पडत नाही. पण जेव्हा तिच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला जातो तेव्हा कंगनाने मौन बाळगणे पसंत केले. आतापर्यंत कंगना राणावतने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल काहीही बोललेले नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने ती लग्न का करत नाही याचा खुलासा केला आहे. (Kangana Ranaut reveals that her marriage does not happen due to these rumors). 

अधिक वाचा : दैव बलवत्तर म्हणून वाचला प्रवाशाचा जीव, पाहा व्हिडीओ

कंगणाने केले लग्नाबाबत भाष्य 

कंगना राणावतने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत सांगितले की ती का लग्न का करू शकत नाही. मी अफवांमुळे लग्न करू शकत नसल्याची टीका कंगनाने यावेळी केली. तिने सांगितले की, 'मी मुलांना मारते' अशा अफवा पसरवल्या आहेत. कंगनाने सांगितले की, या अफवांमुळे तिच्याबद्दल एक छाप निर्माण झाली आहे जी तिला खास व्यक्ती शोधण्यापासून रोखत आहे.

कंगणाने म्हटले लोक अफवा पसरवतात 

या मुलाखतीत कंगनाने आणखी पुढे म्हटले की, "असं नाही की मी खऱ्या आयुष्यात कोणाला मारीन? मी लग्न करू शकत नाही कारण तुमच्यासारखे लोक या अफवा पसरवत आहेत. काही काळापूर्वी कंगनानेही तिच्या भविष्याविषयी भाष्य केले होते. तिने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला पुढील ५ वर्षांत स्वत:ला आई म्हणून बघायचे आहे. कंगना म्हणाली, 'मला लग्न करायचे आहे आणि मुले हवी आहेत. पाच वर्षांत मी स्वत:ला आई आणि पत्नी म्हणून पाहते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी