कंगनाने रेड बिकिनीमधील फोटो केला शेअर, पाहा यूजर्स काय म्हणाले!  

Kangana Ranaut Bikini Pic: अभिनेत्री कंगना रनौतने नुकताच आपला एक जुनाच फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बीचवर लाल रंगाच्या बिकीनीमध्ये दिसून येत आहे.

kangana_bikini
कंगनाने रेड बिकिनीमधील फोटो केला शेअर, पाहा यूजर्स काय म्हणाले!    |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • कंगना रनौतने आपला बिकीनी फोटो सोशल मीडियावर केला शेअर .
  • या थ्रोबॅक फोटोमध्ये कंगना समुद्रकिनाऱ्यावर बिकिनीमध्ये दिसत आहे.
  • कंगनाच्या या फोटोवर यूजर्सने अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिच्या वक्तव्यांमुळे ती बर्‍याचदा चर्चेत देखील असते. पण आता कंगना आपल्या एका फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर स्वत: चा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बीचवर ब्लॅक आणि रेड बिकिनी (red bikini) परिधान केलेली दिसून येत आहे आणि यामुळेच ती चर्चेत आहे.

कंगनाने केला जुनाच फोटो शेअर

कंगनाने आपला जो फोटो शेअर केला आहे तो मेक्सिकोमधील आहे. यामध्ये कंगना पाठमोरी बसली आहे. समुद्रकिनारी बसलेली कंगना ही समुद्राच्या लाटा पाहत निवांतपणे बसली आहे.  हा फोटो शेअर केल्यावर कंगनाने लिहिले की, 'गुड मॉर्निंग मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात सर्वात उत्साहित ठिकाणी म्हणजे मेक्सिकोमध्ये आहे. सुंदर पण एक अनिश्चित जागा. हा फोटो मेक्सिकोमधील टुलुम या छोट्या बेटावरील आहे.'  

लोकांनी अशा दिल्या प्रतिक्रिया 

कंगनाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे आणि त्यावर टिप्पणी देऊन ते सतत तिचे कौतुक करत आहेत. एकीकडे चाहते कंगनाची स्तुती करीत आहेत, तर दुसरीकडे ट्रोलर्सचीही कमतरता नाही. काही यूजर्संनी कंगनाच्या फोटोवर भाष्य केले आणि तिला बनावट झांसी क्वीन म्हटले, तर काहींनी तिचे कपडे कुठे आहेत असे विचारले.

अलीकडेच कंगनाने तिच्या आईबरोबर एक फोटो ट्वीट केला होता आणि म्हटले होते की, 2021 मध्ये तिला नेमके कोठे जायचे आहे. कंगनाने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'काही वर्षांपूर्वी मी आईसोबत काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले होते. मी आतापर्यंत सात ज्योतिर्लिंग पाहिले आहेत. मला २०२१ मध्ये केदारनाथला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. म्हणजेच  माझे आठ ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण होईल. पुढच्या वर्षी मला पुरी जगन्नाथ येथे देखील जायचे आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी