जया बच्चन यांच्या कमेंटवर कंगना राणावतचे उत्तर, श्वेता-अभिषेकचे नाव घेत केला हा सवाल

बी टाऊन
Updated Sep 15, 2020 | 14:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

kangana ranaut on Jaya Bachchan statement : जया बच्चन यांनी संसदेत बॉलिवूडचा मुद्दा उचलत म्हटले की इंडस्ट्रीची बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. यावर कंगना राणावतने उत्तर दिले आहे. 

jaya bachchan
जया बच्चन यांच्या कमेंटवर कंगना राणावतचे उत्तर 

थोडं पण कामाचं

  • जया बच्चन यांनी संसदेत मांडला मुद्दा
  • एंटरटेनमेंट इंडस्ट्री अनेक लोकांना रोजगार देते
  • कंगनाने उत्तरात मागितला सपोर्ट

मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या(parliment monsoon session) दुसऱ्या दिवशी समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन(jaya bachchan) यांनी सिने इंडस्ट्रीची बदनामी करण्याचा मुद्दा उचलला आणि लोकांवर टीका केली ज्या थाळीत जेवतात त्यातच भोक पाडतात. यावर आता कंगना राणावतने(kangana ranaut) उत्तर दिले आहे. तसेच जया बच्चन यांनी तिला काही सपोर्ट द्यायला हवा असेही म्हटले आहे. 

कंगना राणावतने जया बच्चन यांना उत्तर देताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, जयाजी जर माझ्या जागेवर तुमची मुलगी श्वेता बच्चनला टीनएजमध्ये मारले जाते आणि ड्रग्स देऊन तिचे शोषण केले असते तर तुम्ही आताही हेच म्हटलं असतं का? तसेच माझ्याजागी जर अभिषेक बच्चन सातत्याने काही लोकांच्या कटकारस्थानाचा आणि शोषणाचा शिकार झाला असता आणि एके दिवशी तो घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला असता तेव्हाही तुम्ही हेच म्हणाला असता का? यासोबतच कंगनाने हात जोडण्याचा चित्र टाकत लिहिले की थोडी सहानूभूती आणि थोडा पाठिंबा आम्हालाही द्या.

पाहा काय म्हटले होते जया बच्चन यांनी

जया बच्चन यांनी म्हटले की बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रा दररोज ५ लाख लोकांना सरळ रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आणि गोष्टींवरून ध्यान हटवण्यासाठी आमचा वापर केला जात आहे. काही जणांच्या आपापासात केल्या जाणाऱ्या वादांमुळे इंडस्ट्रीचे नुकसान होत आहे. आपापसातील वादाचा परिणाम संपूर्ण इंडस्ट्रीवर झाला नाही पाहिजे. ही इंडस्ट्री अनेकांसाठी जगण्याचे साधन आहे. 

रवी किशन यांनीही केले होते सवाल

संसदेच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी भाजपचे खासदार रवीकिशन यांनी बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण उचलून धरले होते. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला गेला पाहिजे. 

कंगना राणावतवर लावले होते आरोप

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, इंडस्ट्रीच्या बाहेरून येणाऱ्या कलाकारांना पूर्ण संधी दिली जात नाही. मूव्ही माफिया येथे बाहेरच्या लोकांना पुढे जाऊ देत नाहीत. तर इंडस्ट्रीमध्ये ९९ टक्के लोक ड्रग्स घेतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी