Dhaakad Teaser: कंगना राणावतचा 'धाकड'चा टीझर रिलीज, 2 दिवसांनी येणार चित्रपटाचा ट्रेलर

बी टाऊन
Updated Apr 28, 2022 | 09:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dhaakad trailer release date: कंगना राणावतने तिच्या महिला केंद्रित चित्रपट 'धाकड'चा पहिला टीझर रिलीज केला आहे. अभिनेत्रीने हे तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

Kangana Ranaut's teaser release of 'Dhakad', trailer of the movie will come in 2 days
कंगनाच्या बहुचर्चित 'धाकड' सिनेमाचा टीझर रिलीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'धाकड'मध्ये कंगना राणावत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे
  • धाकडचा टीझर व्हिडिओ समोर आला आहे
  • कंगना राणावतने पहिला टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Kangana Ranaut Dhaakad teaser video: सध्या अभिनेत्री कंगना राणावत तिच्या रिअॅलिटी शो लॉक अपमुळे चर्चेत आहे. कंगनाच्या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता याच दरम्यान कंगनाने तिच्या महिला केंद्रित चित्रपट 'धाकड'चा पहिला टीझर रिलीज केला आहे. तिच्या इंस्टाग्रामवर पहिला व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की, 'धाकड' चित्रपटाचा ट्रेलर 2 दिवसांनी येत आहे. धाकडच्या टीझर व्हिडिओमध्ये कंगना राणावतने व्यक्तिरेखेचीही ओळखही करून दिली आहे. या सिनेमात ती एजंट अग्नीच्या भूमिकेत आहे. टीझर व्हिडिओमध्ये कंगना लाल रंगाच्या पोशाखात दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग हेअर कलर आणि बोल्ड मेकअप केला आहे. तसेच, कंगना राणावतने व्हिडीओमध्ये बंदूक हातात धरलेली दिसत आहे. तिच्या चाहत्यांसोबत व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले, "मी ती आग आहे ज्याबद्दल तुम्हाला इशारा दिला होता.  एजंट अग्निच्या रागात होरपळायला तयार राहा... #DhaakadTrailer 2 दिवसात येत आहे. अग्नीला 20 मे रोजी थिएटरमध्ये भेटा.'


'धाकड' या सिनेमात अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रजनीश राजी घई दिग्दर्शित स्पाय-थ्रिलर 20 मे रोजी रिलीज होणार आहे. कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट आजपर्यंतच्या महिला-केंद्रित चित्रपटांमध्ये सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा महिला केंद्रीत चित्रपट ठरणार आहे. 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बहुतांश अॅक्शन सीन बेल्जियममध्ये शूट करण्यात आले आहेत. याला दुजोरा देताना कंगनाने सांगितले की, चित्रपटासाठी स्टंट टीम आणि स्टंट कोरिओग्राफर यूएस आणि यूकेमधून आणले होते.


हा चित्रपट 100 कोटींच्या बजेटमध्ये बनणार आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचे बजेट 70 ते 80 कोटींच्या दरम्यान पोहोचले आहे. ज्यामध्ये प्रमोशनचा खर्च अद्याप समाविष्ट केलेला नाही. प्रमोशनचा खर्च समाविष्ट केल्यानंतर, तो सुमारे 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. एवढा पैसा आतापर्यंत बॉलीवूडमध्ये कोणत्याही अभिनेत्रीच्या चित्रपटावर खर्च झालेला नाही. अशा परिस्थितीत चित्रपट निर्मात्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला कंगानाच्या कारकीर्दीतली ही सर्वात मोठी गोष्ट असेल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी