Kangana Ranaut । मुंबई : अलीकडेच संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार असलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अमेरिकेत झाले. या अवॉर्ड शोमध्ये अनेक हॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली. हा ६४ वा ग्रॅमी पुरस्कार होता, ज्याचे आयोजन अमेरिकेतील लास वेगास मधील एमजीएम गॅंड ॲरिना येथे करण्यात आले. यावेळी रिकी केज आणि फाल्गुनी शाह या दोन भारतीय संगीतकारांचाही गौरव करण्यात आला. परंतु या सोहळ्यात स्वर कोकिळा म्हणून ओळख असलेल्या लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही, त्यामुळे भारतीयांनी सोशल मीडियावर पुरस्कार शोबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान आता कंगना राणावतचाही यावर संताप उफाळून आला आहे. कंगना राणावतने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने ग्रॅमी पुरस्कारावर टीका केली आहे. (Kangana scoffs at Oscar-Grammy awards Angry for ignoring Lata Mangeshkar on the international stage).
अधिक वाचा : राऊतांची ही कृती घोटाळ्यात सहभागी असल्याची कृती -सोमय्या
कंगना राणावतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने 'ग्रॅमी अवॉर्ड'वर टीका केली आहे. कंगणाने एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करताना कंगणाने वेस्टन अवॉर्डवर बहिष्कार टाकण्याबद्दल सांगितले. कंगणाने तिच्या पोस्टमध्ये लिहले की, "आम्ही आंतरराष्ट्रीय असल्याचा दावा करणाऱ्या आणि दिग्गज कलाकारांना त्यांच्या जाती किंवा विचारसरणीमुळे दुर्लक्षित करणाऱ्या कोणत्याही स्थानिक पुरस्काराविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे."
अधिक वाचा : फक्त एका व्यक्तीसाठी रणबीर-आलियाच्या लग्नाची होतेय 'लगीनघाई'
पोस्टमध्ये कंगनाने आणखी म्हटले की, "जाणूनबुजून बाजूला करतात. भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात ऑस्कर आणि ग्रॅमी दोन्ही अयशस्वी ठरले आहेत. जागतिक पुरस्कार दावा करणाऱ्या या पक्षपाती स्थानिक कार्यक्रमांवर आपल्या माध्यमांनी पूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे."
कंगना राणावतच्या आधी अनेक सोशल मीडिया युजर्संनी ग्रॅमी अवॉर्डला फटकारले आहे. तसेच ग्रॅमीपूर्वी ऑस्कर पुरस्कार २०२२ मध्ये 'इन मेमोरिअम' सेगमेंटमध्ये भारतीय गायिका लता मंगेशकर यांचे नाव सामाविष्ट नव्हते. यावेळीही भारतीय लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता.