Emergency teaser out: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटातील तिचा पहिला लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे. कंगनाचा हा लूक खूपच दमदार आहे. टीझरमधील कंगनाचा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. टीझर रिलीज करत कंगानाने लिहिले आहे, "सादर करत आहे ज्यांना'सर' म्हटले जात होते. #इमर्जन्सी शूट सुरू होते."
व्हिडिओमध्ये, इंदिरा गांधींची भूमिका साकारणारी कंगना काही अधिकृत फाइल वाचताना दिसत आहे, जेव्हा एक कर्मचारी कार्यालयात येतो आणि तिला विचारतो की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना 'मॅडम' म्हणून संबोधले जाऊ शकते का असे विचारले आहे? त्यावर उत्तर देताना कंगनाने म्हटले आहे, "राष्ट्रपतींना सांगा की माझ्या कार्यालयात लोक मला 'मॅडम' नव्हे तर 'सर' म्हणून संबोधतात.
कंगनाचे इंदिरा गांधींमध्ये झालेले रूपांतर ओळखायलाच येत नाही. केवळ त्यांचा लूकच नाही तर तर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची देहबोली, त्यांचा आवाज, त्यांची बोलण्याची स्टाईलसुद्धा हुबेहुब वठवल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे नऊ महत्त्वाचे निर्णय
कंगनाने चित्रपटातील तिचा पहिला लूक सोशल मीडियावर रिलीज केला आहे ज्यामध्ये ती साडी नेसलेली आहे, हातात चष्मा आहे. पांढरे केसही पाहायला मिळतात. कंगनाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडत आहे. हा लूक शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'इमर्जन्सीचा पहिला लूक' जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि वादग्रस्त महिलांपैकी एक असलेले कॅरेक्टर निभावत आहे'
नेटकऱ्यांना हा टीझर आवडला आणि पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काहींनी हार्ट इमोजी टाकल्या तर काहींनी तिला 'फॅब' म्हटले.
एका यूजरने लिहिले की, "ती एक स्टार आहे."
दुसर्याने टिप्पणी दिली, "My queen is back."
याआधी कंगनाने या चित्रपटातील इंदिरा गांधींच्या भूमिकेत तिचा पहिला लूक शेअर केला होता. तिने लिहिले, "#EmergencyFirstLook सादर करत आहे! जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि वादग्रस्त महिलांपैकी एक आहे."
अधिक वाचा : Nokia C21 Plus लॉन्च; एका चार्जवर 3 दिवस चालणार बॅटरी
डार्केस्ट आवर, वर्ल्ड वॉर झेड आणि द बॅटमॅन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या ऑस्कर विजेत्या डेव्हिड मालिनॉस्कीने कंगनाचा मेकअप केलेला आहे.
यापूर्वी, कंगनाने 1975 मधील वृत्तपत्राची क्लिपिंग शेअर केली होती आणि लिहिले होते, "जगाच्या इतिहासातील या सर्वात नाट्यमय घटना होत्या. जाहीर करण्यात आलेल्या आणीबाणीचे कारण काय आणि त्याचे काय परिणाम झाले. या सगळ्याच्या केंद्रस्थानी होती जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री. त्यामुळे पुढच्या वर्षी #Emergency सह थिएटरमध्ये भेटू."