बेबी डॉल सिंगर कनिका कपूरला कोरोना, विना तपासणी एअरपोर्टवरून निघाली

बी टाऊन
Updated Mar 20, 2020 | 16:37 IST

बॉलिवूडची सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. कनिका एअरपोर्टवरून कशी तरी तपासणी न करता निघाली, पण आता तिच्या इमारतीतील सर्व नागरिक दहशतीत आहे.

kanika kapoor bollywood playback singer tested corona positive birthday party outbreak health news in marathi
बेबी डॉल सिंगर कनिका कपूरला कोरोना, विना तपासणी एअरपोर्टवरून निघाली 

लखनऊ : बॉलिवूडची सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. कनिका एअरपोर्टवरून कशी तरी तपासणी न करता निघाली, पण आता तिच्या इमारतीतील सर्व नागरिक दहशतीत आहे. 

कनिका कपूर १५ मार्च रोजी लंडनहून लखनऊला आली होती. आजपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एअरपोर्टवरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने ती वॉशरूममध्ये लपून तेथून पळून आली. कनिकाने रविवारी लखऊनच्या गॅलेंट अपार्टमेंटमध्ये एक पार्टी केली होती. त्यात लखनऊमधील मोठे अधिकारी आणि नेते शामिल होते. या घटनेनंतर आता ती राहत असलेल्या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

प्रत्येक जण भीतीच्या सावटाखाली आहे. नोकर तसेच पार्टीत कॅटरिंगचे काम करणारे आता दहशतीच्या वातावरणात आहेत. ही बातमीही आहे की कनिका लखनऊच्या ताज हॉटेलमध्येही थांबली होती. तसेच शालिमानर गॅलेंट येथील रहिवाशांबाबत बोलायचे झाले तर बहुतांशी रहिवासी ही इमारत सोडून दुसऱ्या जागी राहायला जात आहेत. कनिका कपूरचे संपूर्ण कुटुंबिय या बिल्डिंगमध्ये राहत आहेत. आता त्यांच्या कुटुंबियंना कॉरनटाइन करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने कनिकाशी संपर्कात आलेल्या सर्वांना कॉल केला आहे. तसेच त्यांना सेल्फ आयसोलेट होण्यास सांगितले आहे. अजून कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षणं दिसत नाही. केवळ गायिका पॉझिटिव्ह आढळली आहे. कनिकाने बेबी डॉल, जुगनी, चिट्टियां कलाइया आणि देसी लूक सारखे सुपरहीट गाणे गायले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...