Kanika Kapoor Coronavirus test: कनिका कपूरची तिसरी टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह

बी टाऊन
Updated Mar 25, 2020 | 15:58 IST

Kanika Kapoor Coronavirus test: कोरोना व्हायरस झाल्यानंतर कनिका कपूरला सध्या लखनऊच्या एका हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Kanika Kapoor
Kanika Kapoor: कनिका कपूरची तिसरी टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: Instagram

नवी दिल्ली अन्य देशांप्रमाणेच भारत देश सुद्धा कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. बॉलिवूड सिंगर कनिका कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. तिला लखनऊच्या संजय गांधी पोस्ट गॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज(SGPGIMS) मध्ये आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. कनिका 9 मार्चला लंडनहून भारतात परतली होती. त्यानंतर तिनं काही पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आणि काही लोकांना सुद्धा भेटली.  यामुळे, कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

कनिका कपूरचे यापूर्वी दोन टेस्ट झालेत, ज्यात कोरोना व्हायरस झाल्याचा रिपोर्ट आला होता. आता पुन्हा एकदा कनिकाची कोरोना व्हायरसची टेस्ट झाली आणि तिसऱ्यांदाही ती पॉझिटिव्ह आढळली आहे. कनिकाच्या कुटुंबियांनी पहिल्या रिपोर्टवर संशय व्यक्त केला होता. ज्यामुळे तिची पुन्हा टेस्ट केली होती. 

एका वेबसाईटनुसार,  SGPGIMS चे संचालक प्राध्यापक आरके धिमन यांनी सांगितलं की, कनिका आता सुद्धा कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळली आहे. जोपर्यत ती कमीत कमी दोन टेस्टमध्ये कोविड- 19 नेगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत तिच्यावर उपचार सुरु राहतील. 

टाइम्स ऑफ इंडियानं सांगितलं होतं की, आरोग्य मंत्रालयानं कनिकाच्या संपर्कात आलेले 162 लोकांची यादी केली आहे, ज्यात 35 लोकं कानपूरमधील आहेत. हे लोकं कनिकासोबत पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यापैकी 63 लोकांचा रिपोर्ट आला असून त्यांचा रिपोर्ट कोरोना व्हायरस नेगेटिव्ह आला. कनिकाच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा तपास सुरु होता. वेबसाईट आपल्या सुत्रांच्या माहितीनुसार सांगितलं की, आरोग्य विभागाचं म्हणणं आहे की, 120-130 लोकांची ओळख पटली आहे आणि त्यांचे सॅम्पल गोळा केलेत. 

कनिकानं ज्या लोकांसोबत पार्टी केली होती, त्यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा भाजप आमदार दुष्यंत राजे देखील सहभागी होते. ज्यांचे टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आलेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you @tods @leonardo.dellavalle #MFW #milano #Tods @storiesofshabeeb Makeup @famidamua

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

कनिका कपूर 9 मार्चला रोजी लंडनहून लखनऊला आली होती. आजपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एअरपोर्टवरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने ती वॉशरूममध्ये लपून तेथून पळून आली. कनिकाने रविवारी लखऊनच्या गॅलेंट अपार्टमेंटमध्ये एक पार्टी केली होती. त्यात लखनऊमधील मोठे अधिकारी आणि नेते शामिल होते. 

कनिका नुकतीच लंडनहून परतली असून ती तिच्या कुटुंबियांसोबत लखनऊ येथे राहात होती. तिने भारतात परतल्यानंतर चार पार्टींना हजेरी लावली असल्याचे तिच्या वडिलांनीच सांगितले आहे. या पार्टींमध्ये ती अनेक लोकांना भेटली होती. हॉटेल ताजमध्ये झालेल्या पार्टीत अनेक मंत्री, आयएस ऑफिसर, सेलिब्रेटी, नेतेमंडळी उपस्थित होते. तिने या पार्टींमध्ये अनेक लोकांसोबत हस्तांदोलन केले असून त्यांच्यासोबत फोटो देखील काढले आहेत. या पार्टीला लोकांसोबतच तिथे काम करणारी मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्व खासदार अकबर अहमद डम्पी यांच्या पार्टीत देखील कनिका गेली होती. या पार्टीत भाजपमधील अनेक नेते उपस्थित होते. 

या पार्टीत 400 हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. तसेच एका व्यवासायिकाच्या पार्टीत देखील कनिका उपस्थित राहिली होती.  त्यामुळे तीन पार्ट्यांमध्ये एकूण 700 जणांच्या संपर्कात कनिका कपूर आल्याचे सांगितले जात आहे. 

कनिकावर लावण्यात आले  हे आरोप

लंडनहून परत आल्यानंतर कनिकावर विमानतळावर स्क्रीनिंग न केल्याचा आरोप झाला आणि हे टाळण्यासाठी वॉशरूममध्ये लपून बसली. स्वत: सिंगरने मात्र हे आरोप फेटाळले आणि सांगितले की आंतरराष्ट्रीय विमानाने आलेल्या व्यक्तीला स्क्रीनिंगपासून वाचणे कसे शक्य आहे? मला मुंबई विमानतळावर दाखवले गेले आणि मी एक दिवस मुंबईत थांबली, पण सर्व काही लॉकडाऊन होते, म्हणून माझ्या आई-वडिलांनी मला घरी येण्याचा सल्ला दिला, त्यानंतर मी 11 मार्चला लखनऊला गेली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Milano #mfw #ss20

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

कनिका विरोधात एफआयआर दाखल

यूपी पोलिसांनी कनिकाविरोधात एफआयआर दाखल केला होता. या प्राणघातक रोगाचा प्रसार करण्याच्या आरोपाखाली सिंगरविरोधात आयपीसीच्या कलम 269 आणि 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...