Sandalwood Industry : राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळला कन्नड अभिनेत्याचा मृतदेह

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 22, 2022 | 11:44 IST

कन्नड चित्रपटसृष्टी (Kannada Film Industry) हादरली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता सतीश वज्र (Sathish Vajra) याचा मृतदेह राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. सतीश वज्र याची धारदार शस्राने हत्या करण्यात आली. राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सतीच याचा मृतदेह आढळून आला. सतीशची धाकदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे सतीशच्या मृत्यूनंतर कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

Kannada actor Sathish Vajra murder in at his residence
कन्नड अभिनेता सतीश वज्रची राहत्या घरी हत्या  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सतीशने ‘लागोरी’ या चित्रपटातून कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
  • सतीशच्या मेहुण्यावर हत्येला संशय व्यक्त केला जात असल्याची माहिती
  • सतीशच्या लग्नाला त्याच्या सासरच्या मंडळींचा विरोध होता.

Sathish Vajra murder : नवी दिल्ली :  कन्नड चित्रपटसृष्टी (Kannada Film Industry) हादरली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता सतीश वज्र (Sathish Vajra) याचा मृतदेह राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. सतीश वज्र याची धारदार शस्राने हत्या करण्यात आली. राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सतीच याचा मृतदेह आढळून आला. सतीशची धाकदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे सतीशच्या मृत्यूनंतर कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सतीशच्या घराच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सतीशच्या मेहुण्यावर हत्येला संशय व्यक्त केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच सतीशच्या पत्नीने आत्महत्या केली होती. सतीशने ‘लागोरी’ या चित्रपटातून कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते. तो कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यात राहत होता. सतीश रविवारी कामावरून घरी आला होता. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घरमालकाने सगळ्यात आधी सतीश मृतदेह पाहिला, त्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सासरच्या मंडळींवर संशय

मिळालेली माहिती अशी की, सतीशच्या लग्नाला त्याच्या सासरच्या मंडळींचा विरोध होता. तरी देखील सतीश आणि त्याच्या पत्नीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळे सासरची मंडळी सतीशवर नाराज होती. त्यावरून सतीश आणि त्याच्या सासरच्या लोकांमध्ये मागील काही कुटुंबात वाद होते.

बहिणीच्या आत्महत्येचा बदला?

बहिणीने आपल्या विरोधात जाऊन सतीशसोबत लग्न केल्याचा राग सतीशच्या मेहुण्याच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी सतीशची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी