Kannada Actress Died: वजन कमी करण्याच्या नादात अभिनेत्रीने गमावला जीव; कमी वयातच घेतला जगाचा निरोप

Kannada Actress Chethana Raj Died । मागील काही वर्षांपासून प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण खूप वाढले आहे. सुंदर आणि परफेक्ट दिसण्यासाठी अनेक तरूणी अनेकदा शस्त्रक्रियेचा अवलंब करतात.

Kannada Actress Chethana Raj died at age of 21
वजन कमी करण्याच्या नादात अभिनेत्रीने गमावला जीव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मागील काही वर्षांपासून प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण खूप वाढले आहे.
  • सुंदर आणि परफेक्ट दिसण्यासाठी अनेक तरूणी अनेकदा शस्त्रक्रियेचा अवलंब करतात.
  • कन्नड अभिनेत्री चेतना राज शस्त्रक्रियेची शिकार झाली आहे.

Kannada Actress Chethana Raj Died । नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण खूप वाढले आहे. सुंदर आणि परफेक्ट दिसण्यासाठी अनेक तरूणी अनेकदा शस्त्रक्रियेचा अवलंब करतात. अनेक शस्त्रक्रियांमध्ये मृत्यूचा धोकाही असतो आणि कन्नड अभिनेत्री चेतना राजही अशाच धोक्याची बळी ठरली आहे. कारण प्लास्टिक सर्जरी करताना झालेल्या चुकीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. (Kannada Actress Chethana Raj died at age of 21). 

अधिक वाचा : पतीच्या मृत्यूनंतर ३६ वर्षांपासून महिला पुरूष बनून वावरतेय

२१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

दरम्यान, सोमवारी कन्नड अभिनेत्री चेतना राज हिला फॅट फ्री शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीला काही बरे वाटत नव्हते. सायंकाळपर्यंत तिची प्रकृती ढासळू लागली आणि तिच्या फुफ्फुसात पाणी भरू लागले. कन्नड टीव्ही अभिनेत्रीला हे दुःख फार काळ सहन करता आले नाही आणि तिने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

नातेवाईकांनी केले डॉक्टरांवर आरोप

मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, चेतना राजने तिच्या आई-वडिलांना शस्त्रक्रियेची माहिती दिली नाही आणि ती तिच्या मित्रांसह हॉस्पिटलमध्ये गेली. आता चेतनाचे पालक डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. डॉक्टरांच्या चुकीमुळेच त्यांच्या मुलीचा अकाली मृत्यू झाल्याचे अभिनेत्रीच्या पालकांचे म्हणणे आहे. चेतनाच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटल कमिटीविरुद्ध जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अनेक मालिकांमध्ये केले होते काम  

लक्षणीय बाब म्हणजे चेतना राज कन्नड टीव्ही जगतातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने 'गीता' आणि 'दोरेसानी' या प्रसिद्ध मालिका यांसारख्या मालिकांमध्ये चांगले काम केले. चेतनाने अचानक हे जग सोडल्याने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. चेतनाच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच दु:ख झाले असून, शस्त्रक्रियेद्वारे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत एका तरुण अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला ही देखील दु:खद बाब आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी