Puneeth Rajkumar हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ४६ वर्षांच्या अभिनेत्याचा मृत्यू

कानडी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar / पुनीथ राजकुमार) याचे ४६व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. 

Kannada star Puneeth Rajkumar passes away at 46
हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ४६ वर्षांच्या अभिनेत्याचा मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ४६ वर्षांच्या अभिनेत्याचा मृत्यू
  • कानडी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुनीत राजकुमार याचे निधन
  • सेलिब्रेटींनी व्यक्त केला शोक

Kannada star Puneeth Rajkumar passes away at 46 । बंगळुरू: कानडी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar / पुनीथ राजकुमार) याचे ४६व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पुनीत राजकुमारच्या निधनाचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला.

छातीत असह्य वेदना होऊ लागल्याची तक्रार करताच पुनीतला घरच्यांनी बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये नेले. पण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याआधीच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करुन बघितले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अखेर डॉक्टरांनी इसीजी काढून बघितला. सरळ रेषेतला इसीजी आला आणि डॉक्टरांनी पुनीतचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

राजकुमार यांचा मुलगा असलेला पुनीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अप्पू या नावाने ओळखला जात होता. त्याने १९८०च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बाल कलाकार म्हणून त्याने कारकिर्द सुरू केली. राम, हुदुगरु, अंजनी पुत्र या त्याचे लोकप्रिय चित्रपट होते. युवारत्न हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट याच वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. 

अनिल कपूर, मोहनलाल, माम्मुट्टी, चिरंजीवी, आर. माधवन, ज्यु. एनटीआर, रामचरण, सिद्धार्थ, राम गोपाल वर्मा, राणा दुग्गुबाती, डी. सलमान, तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, सुधीर बाबू, श्रीधर पिल्लई, पार्वती यांच्यासह अनेक कलाकारांनी पुनीत राजकुमारच्या निधनाचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी