Kantara Sequal: ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) दिग्दर्शित (Direction) कन्नड (Kannada) चित्रपट 'कांतारा' ने जगभरात आपल्या यशाचा झेंडा फडकावला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबत ऋषभ शेट्टीने यात अभिनय पण केला होता. होम्बले (Homble) चित्रपटाच्या बॅनरखाली 'कंतारा'ने लाखो लोकांचे मन जिंकले आणि जगभरात 450 कोटींची कमाई केली. कन्नड भाषेत बनवलेला या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी याला हिंदीमध्ये पण रिलीज केला. चित्रपटाला मिळत असलेल प्रेम आणि यश पाहून निर्मात्यांनी अलीकडे चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.
30 सप्टेंबर रोजी 'पोनियिन सेल्वन' बरोबर चित्रपटगृहात रिलीज झालेला 'कांतारा' ने मणिरत्नमच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर दिली. या चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने अलीकडे चित्रपटाच्या 100 दिवसाच्या यशानंतर ही घोषणा केली. यावेळी बोलताना म्हणाले " मी खूप खुश आहे आणि अभारी आहे, ज्यांनी कांताराला खूप प्रेम दिले आणि पाठिंबा दिला आणि या प्रवासाला पुढे आणले.
अधिक वाचा : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने चित्रपटाने यशस्वीरित्याने 100 दिवस पूर्ण केले आहेत. मी या विशेषप्रसंगी कांतारा चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा करत आहे. तुम्ही जे पाहिले ते खर तर पार्ट 2 आहे, पार्ट 1 पुढच्या वर्षी येणार आहे.
जेव्हा मी कांताराची शुटिंग करत होतो तेव्हा असा विचार माझ्या डोक्यात आला कारण कांताराचा इतिहास खूप खोल आहे. चित्रपटाच्या कथा लेखनाविषयी सांगायचे तर त्यावर आम्ही अधिक मेहनत घेत आहोत. कारण शोध अजून चालूच आहे म्हणून चित्रपटाच्या तपशीलांबद्दल काहीही उघड करणे ही घाई होईल.
अधिक वाचा : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी
या विशेषप्रसंगी निर्माता विजय किरागंदुरने या गोष्टीबद्दल बोले आणि म्हणाले, " कांताराने प्रेक्षकांना एक पूर्णपणे नवीन सिनेमाची ओळख करून दिली. आम्ही हे कायम ठेवू आणि या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणामुळे प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्साह भरला. या चित्रपटाने आता 100 दिवस पूर्ण केले असल्याने त्याचे प्रमोशन करणार आहे.