Kantara Hindi Box Office: रिषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची कतरिना-जान्हवीच्या सिनेमांना तगडी टक्कर, कमाईचे मोडले विक्रम

बी टाऊन
Updated Nov 05, 2022 | 22:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kantara Hindi Box Office: रिषभ शेट्टीच्या कांताराचा (Kantara) बॉक्स ऑफिसवरही (Box office collection) धुमाकूळ सुरू आहे. या सिनेमाने आतापर्यंत 250 कोटींहून अधिक कमाई केलेली आहे. हिंदीतही या सिनेमाने विक्रम केलेला आहे. एवढंच नाही तर कतरिना कैफच्या फोनभूत आणि जान्हवी कपूरच्या मिली सिनेमाला कमाईच्याबाबतीत मागे टाकले आहे.

kantara hindi box office collection katrina and janhavi movie
'कांतारा'ची हिंदी सिनेमांना टक्कर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रिषभ शेट्टीच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
  • 'कांतारा'सिनेमाची कतरिना-जान्हवीच्या सिनेमांना टक्कर
  • 'कांतारा' सर्वाधिक कमाई करणारा 7 वा सिनेमा

Kantara Hindi Box Office: कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीचा (Rishabh Shetty) सिनेमा कांतारा (Kantara movie) हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच (Box office collection)  प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा सिनेमा 14 ऑक्टोबरला हिंदीमध्ये रिलीज झाला, सिनेमाच्या कमाईचा आकडा सातत्याने वाढत आहे. (kantara hindi box office collection katrina and janhavi movie )


रिषभ शेट्टीच्या सिनेमाने हिंदीमध्ये संथ सुरुवात केली होती, ओपनिंग डेला 1.27 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत आहे. कांताराच्या दुसऱ्या वीकेंडपर्यंत कमाईचा आकडा 31 कोटींवर पोहोचला होता. आता या सिनेमाच्या तिसऱ्या आठवड्याचे आकडे आले आहेत. या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात हिंदी बॉक्स ऑफिसवर 51.65 कोटींची कमाई केली आहे. यासह हा सिनेमा आता चौथ्या आठवड्यात पोहोचला असून, यासह कमाईतही वाढ झाली आहे. सिनेमाची एकूण कमाई आता 53 कोटींवर गेली आहे. दुसरीकडे, 4 नोव्हेंबर रोजी रिलीज झालेल्या मिली, डबल एक्सएल आणि फोनभूतचा देखील कांताराच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नाही.

अधिक वाचा : अशाप्रकारे खा Dry Fruits, 'नो साईड इफेक्ट्स'


कांतारा हा सर्वाधिक कमाई करणारा 7वा सिनेमा ठरला आहे


कांतारा हा कन्नड सिनेमा उद्योगातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. त्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पॅन इंडियाचा रॉकिंग स्टार यशच्या सिनेमाचा समावेश आहे. त्याच वेळी, कांतारा हा हिंदीमध्ये डब केलेला 7वा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. त्यात बाहुबली 2, KGF 2, RRR, 2.O, बाहुबली आणि पुष्पा या नावांचा समावेश आहे. 

फोनभूत सिनेमाला म्हणावं तसं यश नाही

कतरिना कैफ (Katrina kaif), इशान खट्टर (Ishaan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (siddhant) स्टारर 'फोनभूत' सिनेमाची स्टोरीलाईन चांगली आहे. पण हा सिनेमा म्हणावा तसा खुलवता आलेला नाही. दोन मुलगे.. एका स्त्री भूतासोबत धमाल आणि मस्ती करत आहेत ही आहे सिनेमाची वनलाईन स्टोरी.. मात्र, हा सिनेमा म्हणजे डोक्याला ताप असल्याचं म्हटलं जात आहे. यापेक्षाही एखादा चांगला सिनेमा कतरिना कैफला सेकंड इनिंग सुरू करण्यासाठी करता आला असता. सिनेमाची वनलाईन चांगली असली तरी तिची मांडणी हवी तशी जमलेली नसल्याचं मत समीक्षकांनी व्यक्त केलं आहे. 

अधिक वाचा : सलमान खानने घेतली 'या' स्पर्धकाची शाळा

दुसरीकडे, जान्हवी कपूरचा (Janhavi kapoor) मिली (Mili movie) हा 2019 साली रिलीज झालेल्या हेलेन या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. ए.आर. रेहमान यांचं संगीत असूनही सिनेमातील गाणी फारशी काही गाजलेली नाही. जान्हवीने अभिनय मात्र, उत्तम केलेला आहे. आतापर्यंतचा तिचा हा सर्वोत्तम अभिनय आहे असं म्हणता येईल. सिनेमाची कथा फर्स्ट हाफमध्ये काहीशी रेंगाळते. सिनेमाच्या स्क्रीप्टवर आणखी थोडं काम करण्याची गरज होती. 

एकूणंच काय या दोन्ही बॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत याआधी रिलीज झालेल्या कांतारानेच हिंदी बॉक्स ऑफिसवरचा आपला दबदबा कायम ठेवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी