Karan Johar 6 Regret in Life: करण जोहरने वैयक्तिक आयुष्याबाबत केले 6 धक्कादायक खुलासे, आयुष्यातील खंत

बी टाऊन
Updated Jun 16, 2022 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Karan Johar 6 Regret in Life: करण जोहरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी 6 खुलासे केले आहेत. अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कटू सत्य सांगितले ज्यापासून प्रत्येकजण अद्याप अनभिज्ञ आहे.

Karan Johar made 6 shocking revelations about his personal life
करण जोहरचा वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • करण जोहरचे 6 धक्कादायक खुलासे
  • आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करणने केला
  • लाईफ पार्टनर, वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष न दिल्याचा करण जोहरला पश्चाताप

Karan Johar 6 Regret in Life: धर्मा प्रॉडक्शनचा मालक आणि करोडोंच्या संपत्तीचा मालक करण जोहर याचं बॉलिवूडमध्ये मोठ्या आदरानं घेतलं जातं. सिनेसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या करण जोहरसोबत काम करणे हे प्रत्येक स्टारचे स्वप्न असते. पण अलीकडेच करण जोहरने त्याच्या आयुष्याची अशी काही पाने उघड केली जी तो त्याच्या आयुष्यातील काळी बाजू मानतो. किंवा असे म्हणा की करण जोहरला आज काही गोष्टींचा पश्चाताप होतो.

मुलाखतीत केला अनेक गोष्टींचा उलगडा


फिल्म कम्पेनियनला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक रहस्य उघड केली आहेत. त्यांच्याबद्दल एक एक करून जाणून घ्या.


पहिले रहस्य - करण जोहर म्हणाला की मी माझ्या वैयक्तिक आयुष्याकडे थोडे अधिक लक्ष द्यायला हवे होते. मी असे केले आहे असे मला वाटत नाही.


दुसरे रहस्य

करण जोहर म्हणतो एक पालक म्हणून मला खूप समाधान वाटते.देवाचे आभार मानतो मी ते पाऊल उचलले. पण मला वाटतं मी हा निर्णय ५ वर्षांपूर्वी घेतला असता तर बरे झाले असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

तिसरे रहस्य

फिल्म प्रोडक्शन, स्टुडिओ बिल्डिंग यांसारख्या कामांमुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर फारसे लक्ष केंद्रित करू शकलो नाही,असे करण जोहरचे म्हणणे आहे. 


चौथे रहस्य

आयुष्यातील त्या गोष्टीला जे महत्त्व द्यायला हवे होते ते त्या वेळी दिले नाही ही माझी सर्वात मोठी खंत आहे. आता खूप उशीर झाला आहे.असेही करण जोहरने स्पष्ट केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)


पाचवे रहस्य

आयुष्याचा जोडीदार मिळायला उशीर झाला आहे. तुमचा लाइफ पार्टनर तुमच्यासाठी जे काही करतो ते आई-वडील किंवा मुले कधीच करू शकत नाहीत. त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाला जोडीदार असावा. मला मात्र, आता ते कठीण आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)


सहावे रहस्य

आयुष्यात जोडीदाराचे खास महत्त्व असते. लाइफ पार्टनर हा तुमच्या नात्याचा आणि प्रणयाचा जोडीदार असतो. माझ्याकडे ते नाही. माझ्या आयुष्यातील ही एक रिकामी जागा आहे आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी