आलिया भट्टनं प्रेग्नेंसीबद्दल सांगितल्यावर करण जोहरला कोसळलं रडू; मिठी मारून म्हणाला, ''तुमच्या बाळाला...''

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jul 06, 2022 | 15:40 IST

आलिया आणि तिचा पती रणबीर कपूर दोघंही त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Karan Johar and Alia Bhatt
करण जोहर आणि आलिया भट्ट  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी दोन महिन्यांपूर्वी लग्न केलं.
  • हे कपल बॉलिवूडमधल्या फेव्हरेट कपलपैकी एक आहे.
  • काही दिवसांपूर्वी आलिया भट्टनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली.

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी दोन महिन्यांपूर्वी लग्न केलं. हे कपल बॉलिवूडमधल्या फेव्हरेट कपलपैकी एक आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आलिया भट्टनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टद्वारे तिनं तिच्या गरोदरपणाची माहिती दिली. त्यानंतर सगळेच आनंदी झाले. त्यानंतर आलिया आणि तिचा पती रणबीर कपूर दोघंही त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान सिनेनिर्माता करण जोहर आलियाचा अगदी जवळचा मानला जातो. जेव्हा आलियानं पहिल्यांदा त्याला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं तेव्हा त्यानं कशी प्रतिक्रिया दिली हे शेअर केलं आहे. 

अन् मी रडलो...: करण जोहर 

करणनं सांगितलं की तो खूप रडला होता. करणनं त्यावेळीचा प्रसंग शेअर केला. ती माझ्या ऑफिसमध्ये आली. मला आठवत की माझे केस खराब झाले होते आणि मी टोपी घालून हुडीत बसलो होतो आणि तिनं मला हे सांगितलं. त्यानंतर माझे पहिले इमोशन आले ते म्हणजे अश्रू आणि तिनं मला येऊन मिठी मारली. मला असं वाटत होतं की मला विश्वासच बसत नव्हता की तुम्हाला बाळ होणार आहे.  हे असे होते की आता तुमच्या बाळाला मूल होत आहे. तो माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता, तो अजूनही आहे, असं करणनं एका मुलाखतीत सांगितलं. 

अधिक वाचा-  कशी करतात हरतालिकेची पूजा?; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, कहाणी आणि महत्त्व 

त्यानंतर करण जोहरनं ETimes ला सांगितलं, मी तिला एका उत्कृष्ठ कलाकारातून, या अद्भुत आत्म-निश्चित स्त्रीमध्ये बदलताना पाहिलं आहे आणि मला खूप अभिमान वाटतो. कारण खरोखरच, पालक म्हणून माझ्यासाठी तो एक सुखद धक्का होता. माझे पालकत्वाचा पहिला टप्पा प्रत्यक्षात तिच्यासोबत होता जेव्हा ती 17 वर्षांची असताना आलिया माझ्या ऑफिसमध्ये आली होती. आज ती 29 वर्षांची आहे आणि ही गेली 12 वर्षे आम्हा दोघांसाठी जादुई ठरली आहेत कारण माझे तिच्याशी खूप मजबूत नाते आहे.

त्यानं पुढे म्हटलं की, आलियाच्या बाळाला आपल्या हातात धरण्यासाठी तो थांबू शकत नाही. तो देखील खूप भावनिक क्षण असेल, जेव्हा त्याने स्वतःच्या मुलांना धरलं होतं.

दरम्यान आलिया आणि करणने रॉकी और रानी की प्रेम कहानी यासाठी एकत्र काम करत आहे. जे ते दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात रणवीर सिंग देखील मुख्य भूमिकेत आहे.

करणनं त्याच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली आलिया-स्टार ब्रह्मास्त्रची निर्मितीही केली आहे. या सिनेमात अभिनेत्री पहिल्यांदा रणबीरसोबत स्क्रिन शेअर करत आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी