करीना आणि सैफच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, तैमुर झाला दादा

Kareena Saif Ali Khan blessed with a baby boy: करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. 

Kareena Kapoor Khan and Saif Ali Khan blessed with a baby boy
करीना आणि सैफच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, तैमुर झाला दादा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • करीना आणि सैफच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
  • करीना कपूरने आज मुलाला दिला जन्म
  • नव्या पाहुण्याचं आगमन होताच तैमुल बनला मोठा भाऊ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. आज करीना कपूरने एका मुलाला जन्म दिला आहे. यामुळे आता तैमूर हा दादा बनला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाने बाळाला जन्म दिला. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास करीनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे बेबो म्हणजेच करीनाने बाळाला जन्म दिला. मात्र, अद्याप करीना आणि सैफ यांच्याकडून बाळाच्या जन्म दिल्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. 

अभिनेता रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर सहानीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सैफ आणि बेबोचा फोटो शेअर करत दुसऱ्या बाळाबद्दल अभिनंदन केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी अशी चर्चा रंगली होती की, करीना कपूर मार्च महिन्यात बाळाला जन्म देईल. यानंतर सैफ अली खान याने खुलासा केला होता की बेबोची ड्यू डेट मार्च महिन्यात नाहीये तर फेब्रुवारी महिन्याची आहे. सैफ अली खान याने असंही म्हटलं होतं की, नव्या बाळाच्या स्वागतासाठी तो खूप उत्साही आहे. दुसरं मुल होणं ही एक मोठी जबाबदारी आहे असंही त्याने म्हटलं होतं.

दुसऱ्या बाळाच्या जन्मापूर्वी करीना आणि सैफ अली खान हे आपल्या नवीन घरात शिफ्ट झाले होते. या दोघांनी काही काळापूर्वी हे नवं घर खरेदी केलं होतं. हे नवीन घरं जुन्या घरापासून जवळच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन इमारतीत सैफ अली खानने टॉप फ्लोअरवरील दोन मजले विकत घेतले आहेत जेथे ते आता शिफ्ट झाले आहेत.

करीनाचे प्रेग्नसी फोटोशूट

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करीना कपूरने एक प्रेग्नन्सी फोटोशूट केलं होतं. या फोटोजमध्ये करीना कपूर योगा करत असताना दिसत आहे. तसेच फोटोजमध्ये करीना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. करीना कपूरच्या या फोटोशूटचे फोटोज सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी