करिना कपूर तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा

kareena kapoor khan is pregnant for third time baby bump photo viral : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरत असल्याचे चित्र आहे.

kareena kapoor khan is pregnant for third time baby bump photo viral
करिना कपूर तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • करिना कपूर तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा
  • बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करिना हिचे काही फोटो सोशल मीडियावर आले
  • फोटोंमध्ये करिनाचे वाढलेले पोट दिसत आहे

kareena kapoor khan is pregnant for third time baby bump photo viral : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरत असल्याचे चित्र आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करिना हिचे काही फोटो सोशल मीडियावर आले आहेत. यातील अनेक फोटोंमध्ये ती कोणाच्या तरी मागे लपून स्वतःचे पोट लपविण्याचा किंवा सैल कपडे घालून वावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही फोटोंमध्ये करिनाने पोटावर हात ठेवल्याचे दिसत आहे. बरेच प्रयत्न केले तरी निवडक फोटोंमध्ये करिनाचे वाढलेले पोट दिसत आहे. करिनाचे हे फोटो बघूनच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. करिना तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

सध्या करिना, सैफ अली खान, तैमूर आणि जेह हे चौघे लंडनमध्ये आहेत. लंडनमध्ये सुटी एन्जॉय करत असलेल्या या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये करिनाचे वाढलेले पोट (बेबी बंप) बघून काही जणांनी ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. 

करिनासोबत लंडनमध्ये मोठी बहीण करिश्मा कपूर आणि बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा पण आहे. सर्व जण लंडन ट्रिप एन्जॉय करत आहेत. याच व्हेकेशनमध्ये काही ठिकाणी चाहत्यांसोबत करिना आणि सैफने निवडक फोटो काढले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर आले आणि त्यात बेबी बंप बघून करिना गरोदर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

करिना खरंच गरोदर आहे का हे अधिकृतरित्या अद्याप समजलेले नाही. करिना किंवा तिच्या जवळच्या नातलगांपैकी कोणीही काहीही माहिती दिलेली नाही. पण फोटो बघून चाहत्यांनी करिना गरोदर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर आलेले फोटो फोटोशॉप करून अपलोड करण्यात आल्याचा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे. पण असे मत असलेल्यांपेक्षा करिना तिसऱ्यांदा गरोदर आहे असे मत असलेल्यांचे प्रमाण सोशल मीडियावर जास्त असल्याचे चित्र आहे.

करिनाच्या करिअरमधील अपडेट

करिना कपूर खान लवकरच आमिर खान सोबत 'लाल सिंग चड्ढा' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी