डिलीव्हरीनंतर करीना कपूरने असे केले होते वजन कमी, जाणून घ्या तिचा डाएट प्लान

बी टाऊन
Updated Jun 08, 2021 | 12:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नियमितपणे योगा आणि एक्सरसाईज करते. ४० वर्षीय करीना कपूर फिटनेसच्या बाबतीत युवा अभिनेत्रींनाही टक्कर देते. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज जिन्यांवर चढ-उतार करते. 

kareena kapoor
डिलीव्हरीनंतर करीना कपूरने असे केले होते वजन कमी 

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे डाएट प्लानिंग करते.
  • अभिनेत्री करीना कपूरचे प्रेग्नंसीदरम्यान वजन खूप वाढले होते
  • दरम्यान, डिलीव्हरीनंतर तिने वर्कआऊट रूटीन आणि डाएटच्या मदतीने आपले शरीर पुन्हा शेपमध्ये आणले.

मुंबई: जेव्हा फिटनेसची गोष्ट येते तेव्हा सगळ्यात आधी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे(bollywood actress kareena kapoor) नाव समोर येते. करीना कपूरने सिने इंडस्ट्रीमध्ये(cine indusrty) झिरो फिगरचा ट्रेंड सुरू केला होता. दरम्यान, करीना कपूर आता दोन मुलांची आई आहे. मात्र यानंतरही तिचा फिटनेस(fitness) करोडो तरूण-तरूणींसाठी प्रेरणादायी आहे. (kareena kapoor loss he weight after delievery with this diet plan)

अभिनेत्री करीना कपूरचे प्रेग्नंसीदरम्यान वजन खूप वाढले होते. दरम्यान, डिलीव्हरीनंतर तिने वर्कआऊट रूटीन आणि डाएटच्या मदतीने आपले शरीर पुन्हा शेपमध्ये आणले. अशातच आज आम्ही तुम्हाला करीना कपूरचे डाएट आणि तिचे फिटनेस रूटीन सांगणार आहोत. 

वर्कआऊट रूटीन - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नियमितपणे योगा आणि एक्सरसाईज करते. ४० वर्षीय करीना फिटनेसच्या बाबतीत अनेक युवा अभिनेत्रींना टक्कर देते. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज जिने चढते-उतरते. यासोबतच पिलेट्सही करते. याशिवाय करीना कपूर आठवड्यातील काही दिवस योगा तर काही दिवस मेडिटेशन करते. सोबतच ती दररोज एक्सरसाईजही करते. दरम्यान, रविवारी मात्र ती वर्कआऊटमधून सुट्टी घेते. 

करीना कपूरचा डाएट प्लान - अभिनेत्री करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे डाएट प्लानिंग करते. तैमूरच्या जन्मानंतर करीनाने ऋजुताने दिलेल्या डाएट टिप्स फॉलो केल्या होत्या. ऋजुताने सांगितले होते की ती दिवसभराचे खाणे ८ भागांमध्ये विभागने. करीना सकाळची सुरूवात भिजवलेल्या काळ्या मनुका आणि केसर खात करत. सकाळी नाश्त्यामध्ये ती पराठे आणि चटणी खाते. नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी नारळपाणी पिते.

नारळ पाण्यात तुळस आणि सब्जाच्या बिया असतात. कारण यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. दुपारच्या जेवणात अभिनेत्री करीना दही आणि भातासोबत पापड खाते. मध्येच ती अक्रोड आणि काजू स्नॅक्स म्हणून खाते. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये ती मिल्कशेक घेते. ऱात्री ती हलके जेवण घेते. यात ती खिचडी आणि दही खाते. याशिवाय डिनरमध्ये ती कधी कधी सुरणाची टिक्की आणि व्हेज पुलावही घेते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी