करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचा फोटो आला समोर...

बी टाऊन
Updated Feb 23, 2021 | 17:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

करीना कपूर आपल्या लाडक्या बाळासह घरी परतली आहे. घरी पोहोचण्याआधीच फोटोग्राफर्सने त्यांना घेरले. त्यांच्या कुटुंबियांसोबत काही फोटोज आणि व्हिडिओज समोर आले आहेत. 

kareena kapoor
करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचा फोटो आला समोर... 

थोडं पण कामाचं

  • करीना कपूरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
  • हॉस्पिटलवरून परतलेल्या करिनासोबत सैफ अली खान, तैमूर आणि तिचा छोटा भाऊ दिसला. 
  • नाना रणधीर कपूरने सांगितले होते की तैमूर छोट्या भावाच्या जन्मानंतर खूपच उत्साही आहे.

मुंबई: करीना कपूरला डिलीव्हरीनंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिने २१ फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला.त्यांच्या घराबाहेर फोटोग्राफर्सनी आधीच डेरा घातला होता. तिच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी सगळेच आतुर होते. हॉस्पिटलवरून परतलेल्या करीनाचा आणि तिच्या मुलाचा एक फोटो टिपण्यासाठी सारेच फोटोग्राफर्स आसुसलेले होते. 

कुशीत दिसला सैफचा छोटा मुलगा

करीना कपूरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी फोटोग्राफर्सपासून ते तिचे चाहते सगळेच उतावळे आहेत. सैफ-करीनाचा मुलगा तैमूरचे फोटो आणि व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतत. सोशल मीडियावर तैमूरचे प्रचंड चाहते आहेत. हॉस्पिटलवरून परतलेल्या करिनासोबत सैफ अली खान, तैमूर आणि तिचा छोटा भाऊ दिसला. 

kareena baby

pic

saif taimur

kareena kapoor

(सर्व फोटो साभार - नवभारत टाईम्स)

रणधीर यांनी सांगितले होते, तैमूरसारखा दिसतो छोटा मुलगा

कपूर खानदान आणि पटौदी कुटुंब करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर खूप खूश आहेत. नाना रणधीर कपूरने सांगितले होते की तैमूर छोट्या भावाच्या जन्मानंतर खूपच उत्साही आहे. रणधीर यांना जेव्हा विचारण्यात आले की करीनाचा छोटा मुलगा कसा दिसतो? यावर ते म्हणाले, मला तर सगळी मुले एकसारखीच दिसतात. सर्व लोक म्हणतात तो तैमूरसारखा दिसत आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी