3 Idiots : 3 इडियट्सचा सिक्वेल येणार! करीना कपूरने दिले संकेत

बी टाऊन
Updated Mar 25, 2023 | 20:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

3 Idiots sequel coming soon : बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा 3 इडियट्सचा लवकरच सिक्वेल येणार असल्याचं अभिनेत्री करीना कपूरने संकेत दिले आहेत. तिने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून हे सूचित केले आहे. सुपरहिट चित्रपट 3 इडियट्सच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी असू शकते, कारण हा सिनेमा आज ही लागला तरी मोठ्या आवडीने पाहिला जातो. बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरने याबाबतचे संकेत दिले आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा...

Bollywood News
करीना कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे,  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • करीना ने दिले संकेत
  • बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा 3 इडियट्सचा लवकरच सिक्वेल येणार
  • पहा हा व्हीडियो, काय म्हणाली करीना?..

3 idiots News  : आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन स्टारर 3 इडियट्स चित्रपटाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात हे आम्ही नाही तर स्वतः करीना कपूरने याबाबतचे संकेत दिले आहेत. 3 इडियट्समध्ये करीना कपूरने मुख्य भूमिका केली होती. करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. (Kareena Kapoor video about 3 Iidots sequel coming soon)

अधिक वाचा : ​Riva arora : आईकडून 44 लाखांची कार गिफ्ट मिळालेल्या रिवाचा ग्लॅमर लूक, पहा फोटो

करीना कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती म्हणते की, आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी एकत्र काहीतरी करणार आहेत. या व्हिडीओमध्ये करीना असे बोलताना दिसून येते की, "मला कळाले की, मी सुट्टीवर असताना हे तिघे काहीतरी करण्याच्या तयारीत आहेत.

या व्हिडिओ कॉन्फरन्सची जी क्लिप सुरू आहे, त्यावरून असे दिसतेय की हे तिघेही आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. काहीतरी गडबड नक्की आहे आणि हे शर्मनच्या चित्रपटाचे प्रमोशन आहे, असे समजू नका. मला वाटतं नक्कीच सिक्वेलची तयारी करत असतील. पण फक्त हे तिघेच!.. तेही माझ्याशिवाय कसे?.. मी ताबडतोब बोमनला फोन करून खात्री करते. अखेर जे काही चालले आहे, ते संपूर्ण सिक्वेलसारखेच दिसत आहे!"

हा व्हिडीओ शेअर करताना करीनाने बोमन इराणीला कॅप्शनमध्ये प्रश्न केला आहे की, "तुम्हाला देखील याबाबत काही माहिती नाही का?".

तिने या व्हीडियो खाली लालबूंद झालेले संतप्त इमोजी टाकत लिहिले  "माझा विश्वासच बसत नाहीयेत, की हे लोकं माझ्याशिवाय हे असे करू शकतात? बोमन इराणी, या लोकांनी हे गुपित तुमच्यापासूनही लपवले आहे का?"

अधिक वाचा :​ Suniel Shetty ने जावई केएल राहुलला दिल्या मॅरेज टिप्स, म्हणाला Your Are My Love

2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 3 इडियट्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हीट ठरला होता. ज्यामध्ये आमिर खान, आर.  माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर, बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांसारख्या स्टार्सनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट राजकुमार इरानी यांनी दिग्दर्शित केला होता. 2009 मध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम तोडले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी