Happy Birthday Karishma: ४५व्या वर्षी सुद्धा हॉट दिसते करिष्मा कपूर, आज वाढदिवस!

बी टाऊन
Updated Jun 25, 2019 | 21:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Happy Birthday Karishma: अभिनेत्री करिष्मा कपूर आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करतेय. सध्या करिष्मा बहिण करिना आणि आई बबीता कपूरसोबत लंडनमध्ये सुट्टांचा आनंद घेतेय. नुकताच तिनं एक हॉट फोटो शेअर केलाय. पाहा फोटो...

Karishma Kapoor
वयाच्या पंचेचाळीशीतही हॉट दिसतेय करिष्मा कपूर  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: ९०च्या दशकामध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री करिष्मा कपूरचा आज वाढदिवस आहे. करिष्मा आज ४५ वर्षांची झालीय. मात्र तरीही तिचा हॉटनेस किंचितही कमी झालेला नाही. सध्या करिष्मा बहिण करिना आणि आई बबीता कपूर सोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. तिनं सोशल मीडियावर वाढदिवस साजरा करत एक स्पेशल फोटो शेअर केलाय. यात ती करीना कपूर खान सोबत दिसतेय. फोटोमध्ये दोघी बहिणी छान पोज देताना दिसत आहेत.

करीना कपूर त्यांच्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे जिनं अभिनय क्षेत्रात आपलं नाव उंचावलं. वयाच्या १७ व्या वर्षीच करिष्मानं शिक्षण सोडलं आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिनं १९९१ मध्ये ‘प्रेम कैदी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर करिष्मानं पुलीस ऑफिसर, निश्चय, सपने साजन के, दीदार यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिचे हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.

मात्र करिष्माला खरी ओळख आणि यश मिळालं ते आमिर खान सोबतच्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटानंतर... हा चित्रपट करिष्माच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपट ठरला आणि यासाठी तिला पुरस्कारही मिळाले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Love urself at every age #nofilter #birthdaymood

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

‘राजा हिंदुस्तानी’च्या यशानंतर करिष्मानं दिल तो पागल है, हीरा नंबर १, बीवी नंबर १ आणि हम साथ साथ है सारखे ब्लॉकबस्टर हिट सिनेमे दिले. आज आपल्या ४५ व्या वाढदिवशी लोलो सोशल मीडियावर धूम करतेय. आज तिनं शेअर केलेल्या फोटोतून तिनं हे दाखवून दिलंय की, आजच्या सर्व अभिनेत्रींना ती आजही टक्कर देऊ शकते. या फोटोमध्ये करिष्मा कपूर ब्लॅक मोनोकिनी घातलेली दिसतेय. त्यावर तिनं ब्लॅक सनग्लासही लावलाय. सूर्याकडे बघत करिष्मा खूप हॉट दिसतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#chill

A post shared by KK (@therealkarismakapoor) on


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Twinning once again #balmain #black #sisters #aboutlastnight

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत करिष्मानं लिहिलं, ‘स्वत:वर दररोज प्रेम करा’ #नोफिल्टर #बर्थडेमूड'… करिष्मा कपूर अखेरची २०१२मध्ये ‘डेंजरस इश्क’ या चित्रपटात दिसली होती. तसंच करिष्मानं शाहरुख खानच्या ‘जीरो’ चित्रपटात पाहुण्या कलाकारची भूमिका साकारली होती.

करिष्माच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं २०१६ मध्ये पती संजय कपूर सोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर ती एकटीनंच दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. करिष्माला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Happy Birthday Karishma: ४५व्या वर्षी सुद्धा हॉट दिसते करिष्मा कपूर, आज वाढदिवस! Description: Happy Birthday Karishma: अभिनेत्री करिष्मा कपूर आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करतेय. सध्या करिष्मा बहिण करिना आणि आई बबीता कपूरसोबत लंडनमध्ये सुट्टांचा आनंद घेतेय. नुकताच तिनं एक हॉट फोटो शेअर केलाय. पाहा फोटो...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles