Kapoor Family: कपूर कुटुंबात पुन्हा वाजणार सनई? या अभिनेत्रीने दिले दुसऱ्या लग्नाचे संकेत

बी टाऊन
Updated Apr 29, 2022 | 16:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Karishma Kapoor Wedding । कपूर कुटुंबात अलीकडेच सनई वाजली आहे. रणबीर आणि आलिया एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत, मात्र आता लवकरच या कुटुंबात आणखी एक सनई वाजणार असल्याची चर्चा आहे आणि यावेळी ती वधू म्हणजे करिश्मा कपूर असल्याचे दिसते आहे.

Karishma Kapoor hinted at getting married once again
कपूर कुटुंबात पुन्हा वाजणार सनई?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कपूर कुटुंबात अलीकडेच सनई वाजली आहे.
  • नुकतेच रणबीर आणि आलिया एकमेकांच्या जीवनसाथी झाले आहेत.
  • करिश्मा कपूरने दुसऱ्या लग्नाचे संकेत दिले आहेत.

Karishma Kapoor Wedding । मुंबई : कपूर कुटुंबात अलीकडेच सनई वाजली आहे. रणबीर आणि आलिया एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत, मात्र आता लवकरच या कुटुंबात आणखी एक सनई वाजणार असल्याची चर्चा आहे आणि यावेळी ती वधू म्हणजे करिश्मा कपूर असल्याचे दिसते आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल चाहत्यांना तिच्या मनातले सांगितले आहे. (Karishma Kapoor hinted at getting married once again). 

दुसरे लग्न करणार करिश्मा? 

अभिनेत्री करिश्मा कपूरने नुकतीच इंस्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. खर तर करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' (Ask Me Anything) सेशन केले होते. यादरम्यान करिश्माच्या चाहत्यांनी तिला अनेक मजेदार आणि वैयक्तिक प्रश्नही विचारले, ज्याची उत्तरे अभिनेत्रीने दिली आहेत. यादरम्यान लोकांनी करिश्मा कपूरला तिचे आवडते खाद्यपदार्थ, आवडते स्टार्स, आवडता रंग विचारले आणि तू पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारला. 

अधिक वाचा : अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सांगितली आवडती गोष्ट 

या 'आस्क मी एनिथिंग' सेशन दरम्यान करिश्मा कपूरला रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्यामध्ये कोण जास्त आवडते हे देखील विचारण्यात आले. या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेत्रीने 'दोघेही' असे उत्तर दिले. याच सेशन दरम्यान करिश्माने सांगितले की, तिचा आवडते पदार्थ बिर्याणी आहे.

लग्नाबाबत केले हे वक्तव्य

दरम्यान, अभिनेत्रीने सांगितले की तिचा आवडता रंग ब्लॅक आहे. 'आस्क मी एनिथिंग' सेशन सुरू होते, त्याच दरम्यान तिच्या एका चाहत्याने अभिनेत्रीला एक अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारला, तो प्रश्न असा होता की, ती पुन्हा लग्न करणार का? या प्रश्नाच्या उत्तरात करिश्माने एक गोंधळलेला GIF शेअर केला आणि लिहिले की 'डिपेंड्स' (Depends) म्हणजे ते अवलंबून आहे. लक्षणीय बाब म्हणजे असे खूप कमी वेळा झाले जेव्हा करिश्माने भुतकाळाबद्दल भाष्य केले आहे.

करिश्मा घटस्फोटित आहे

करिश्मा कपूरचे लग्न दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूर सोबत २००३ मध्ये झाले होते. या लग्नापासून अभिनेत्रीला मुलगी अदारा आणि मुलगा कियान ही दोन अपत्ये झाली आहेत. मात्र २०१४ मध्ये करिश्मा आणि संजय यांचे नाते तुटले आणि २०१६ मध्ये करिश्मा आणि संजयचा घटस्फोट झाला. माध्यमांच्या माहितीनुसार, दोघांनीही एकमेकांवर खूप गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे हा घटस्फोट खूप चर्चेत आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी