Karnataka polls : Silverwares worth Rs 39 lakh, belonging to film producer Boney Kapoor, seized in Davangere : चांदीच्या जप्तीमुळे बॉलिवूड डायरेक्टर बोनी कपूर चर्चेत आहेत. निमित्त ठरले आहे विधानसभा निवडणुकीचे.
निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ही घोषणा करत निवडणूक आयोगाने कर्नाटकमध्ये आचारसंहिता लागू केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कर्नाटकच्या सर्व सीमांवर तसेच राज्यातील सर्व प्रमुख रस्ते, रेल्वे आणि जलमार्गांवर पोलीस लक्ष ठेवत आहेत. संशय आल्यास कसून तपासणी होत आहे. ही कारवाई सुरू झाली आणि बॉलिवूड डायरेक्टर बोनी कपूर अडचणीत सापडले.
एका तपासणी दरम्यान कर्नाटकमध्ये 66 किलो वजनाची चांदीची भांडी जप्त झाली. या भांड्यांचे बाजारातील मूल्य 39 लाख रुपये आहे. चांदीची ही भांडी चेन्नईतून बीएमडब्ल्यूमधून कर्नाटकमार्गे मुंबईत जात होती. ही सर्व भांडी बोनी कपूर यांच्या मालकीची होती. भांडी एका वाहनातून हेब्बालू टोल नाक्यावरून पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी टोल नाक्यावर केलेल्या तपासणीत ही भांडी सापडली.
चांदीची भांडी पाच बॉक्समध्ये पॅक केली होती. या भांड्यांशी संबंधित कागदपत्रे तपासणीसाठी मागण्यात आली. यावेळी कोणतीही कागदपत्रे सादर करणे शक्य झाले नाही. यामुळे चांदीची भांडी जप्त करण्यात आली. सध्या कर्नाटकच्या पोलिसांच्या कस्टडीत सर्व चांदीची भांडी आहेत. नियमानुसार कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांच्याकडून मीडियाला देण्यात आली. जप्त केलेली चांदीची भांडी सोडवून आणण्यासाठी बोनी कपूर यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
WAR 2 : Hrithik Roshan पेक्षा जास्त पैसे घेणार Jr NTR
पन्नाशीनंतर फिट राहण्यासाठी माधुरीने दिल्या टिप्स
एक सवय बदलून परिणीतीने घटवले वजन