kartik Aryan : कार्तिकने केले 10 दिवसांचे सर्वात  महागडे शूट, घेतली 20 कोटींची फी

बी टाऊन
Updated Jan 23, 2023 | 12:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kartik Aaryan recalls charging Rs 20 crore for a 10-day shoot during pandemic, Kartik Aaryan Highest Fee Rs 20 crore : बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांमध्ये कार्तिक आर्यनचे नाव घेतले जाते. अनेक मोठे निर्माते त्यांच्या सिनेमातून कार्तिकने काम करावे यासाठी प्रयत्न करत असतात.

Kartik Aaryan recalls charging Rs 20 crore for a 10-day shoot during pandemic
कार्तिकने केले 10 दिवसांचे सर्वात  महागडे शूट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कार्तिकने केले 10 दिवसांचे सर्वात  महागडे शूट
  • कार्तिकने घेतली 20 कोटींची फी
  • बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांमध्ये कार्तिक आर्यन

Kartik Aaryan recalls charging Rs 20 crore for a 10-day shoot during pandemic, Kartik Aaryan Highest Fee Rs 20 crore : बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांमध्ये कार्तिक आर्यनचे नाव घेतले जाते. अनेक मोठे निर्माते त्यांच्या सिनेमातून कार्तिकने काम करावे यासाठी प्रयत्न करत असतात. या परिस्थितीचा फायदा घेत कार्तिकने त्याच्या सिनेमासाठीच्या फीमध्ये वाढ केली आहे. निर्माते ही फी देण्यास पण तयार झाले आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार कार्तिकने कोविड काळात एका सिनेमाच्या फक्त 10 दिवसांच्या शूटिंगसाठी 20 कोटी रुपये सिनेमा फी आकारली होती. हा ओटीटीसाठी तयार होत असलेली धमाका नावाचा सिनेमा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पण अद्याप या शक्यतेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कार्तिकने पण कोणत्या शूटिंगसाठी 10 दिवसांचे 20 कोटी रुपये घेतले हे जाहीर केलेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका हॉटेलमध्ये कार्तिकने सिनेमासाठीचे 10 दिवसांचे शूटिंग केले. 'प्यार का पंचनामा' या पहिल्या सिनेमासाठी सव्वा लाख रुपये फी घेणाऱ्या कार्तिक आर्यनने आता फक्त 10 दिवसांच्या शूटिंगचे 20 कोटी रुपये घेतले. वाढत्या लोकप्रियतेमुळे कार्तिकच्या फी मध्ये वाढ झाली आहे.

बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये नंबर वन होण्यासाठी सदैव स्पर्धा असते. पण कार्तिक आर्यन स्वतःच नंबर वन असल्याचा दावा करतो आणि सिनेमासाठी मोठी फी पण घेतो. सतत चर्चेत असलेला कार्तिक आर्यन शहजादा, आशिकी 3, सत्यप्रेम की कथा आणि कॅप्टन इंडिया या सिनेमांमधून लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी