Bollywood News: कार्तिक आर्यनचं मुंबईत स्वतःचं घर; त्याच्यासाठी एकदम स्पेशल

बी टाऊन
Updated Jul 11, 2019 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Bollywood News: अभिनेता कार्तिक आर्यननं मुंबईत स्वतःचं घर घेतलं. विशेष म्हणजे ज्या घरात तो एकेकाळी भाड्याने राहत होता. तेच घर त्यानं आता खरेदी केलंय. त्यामुळं त्याच्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जातेय.

kartik aryaan
कार्तिक आर्यननं मुंबईत घेतलं स्वतःचं घर   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कार्तिक आर्यननं मुंबईत घेतलं स्वतःचं घर
  • घरासाठी साठवले होते ९ लाख रुपये
  • भाड्याने राहिलेले घरच कार्तिकने विकत घेतले

मुंबई : प्यार का पंचनामा, सोनू के टीटू की स्वीटी आणि लुका-छिपी सारखे हिट सिनेमे देणारा अभिनेता कार्तिक आर्यन सध्या आपल्या नव्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. पति पत्नी और वो, असं त्याच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. केवळ तरूणीच नाही तर, बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचा क्रश असलेला कार्तिक आर्यन या ना त्या निमित्ताने चर्चेत असतो. सारा अली खानचा तो क्रश आहे. ही दोघं इम्तियाज अलीच्या सिनेमात कामही करत आहेत. दोघं सध्या एकमेकांना डेट करत असल्याचीही इंडस्ट्रीत चर्चा आहे. यामुळं सतत चर्चेत राहणारा कार्तिक आर्यन सध्या एका वेगळा कारणानं चर्चेत आहे. त्यानं मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. विशेष म्हणजे ज्या घरात तो एकेकाळी भाड्याने राहत होता. तेच घर त्यानं आता खरेदी केलंय. त्यामुळं त्याच्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जातेय.

फ्लॅटसाठी पैसे साठवले

मुंबईतल्या एका न्यूज पेपरनं दिलेल्या माहितीनुसार,  मुंबईत कार्तिकने यारी रोडवर एक कोटी ६० लाख रूपयांना एक फ्लॅट खरेदी केला आहे. साडे चारशे स्वेअर फूटांचा हा फ्लॅट पाचव्या मजल्यावर आहे. कार्तिकने मे महिन्यात या फ्लॅटसाठीचे डिल फायनल केले होते. या फ्लॅटसाठी कार्तिकने ९ लाख ६० हजार रूपये जमा केले होते. कार्तिकने हा फ्लॅट आई माला तिवारी यांच्या नावावर खरेदी केला आहे. दरम्यान, न्यूजपेपरने त्याला नव्या फ्लॅट खरेदी संदर्भात विचारले असता त्यानं त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कार्तिकनं खरेदी केलेलं घर त्याच्यासाठी स्पेशल आहे. ग्वाल्हेर हून तो मुंबईत इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी आला होता. तेव्हा तो याच घरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होता.

कार्तिककडे चांगले सिनेमे

कार्तिकने मेहनतीने बॉलिवूडमध्ये बॅक टू बॅक चांगले हिट सिनेमे दिले आहेत. त्याच्या हातात आणखी चांगले सिनेमे आहेत. सध्या कार्तिक इम्तियाज अलीच्या लव आज कल टू या सिनेमात काम करत आहे. त्याच्यासोबत सारा अली खान आणि रणदीप हुड्डा असणार आहेत. त्याचबरोबर कार्तिकचा पति पत्नी और वो सिनेमादेखील पोस्ट प्रोडक्शन मध्ये आहे. त्याच्या त्याच्यासोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे. कार्तिकची स्वतःची एक स्पेस आहे आणि त्याचं कॉमेडी टायमिंग उत्तम असल्याचं भूमीनं सांगितलंय. कार्तिकची एनर्जी लेव्हल चांगली आहे. आमची केमिस्ट्री पडद्यावर पहायला लोकांना आवडेल, असे मत भूमीनं व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bollywood News: कार्तिक आर्यनचं मुंबईत स्वतःचं घर; त्याच्यासाठी एकदम स्पेशल Description: Bollywood News: अभिनेता कार्तिक आर्यननं मुंबईत स्वतःचं घर घेतलं. विशेष म्हणजे ज्या घरात तो एकेकाळी भाड्याने राहत होता. तेच घर त्यानं आता खरेदी केलंय. त्यामुळं त्याच्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जातेय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles