[Video]: सारा नाही 'ही' आहे माझी बेस्टफ्रेंड: कार्तिक आर्यन, पहा व्हायरल व्हिडिओ

बी टाऊन
Updated Jul 09, 2019 | 20:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

कार्तिकने केला इंस्टाग्रामवर क्यूट व्हिडिओ पोस्ट, या व्हिडिओत कार्तिक एका गोंडस मुलीचा हात पकडताना दिसत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंटेस् वर्षाव केला आहे. पहा मस्तीखोर पण प्रेमळ कार्तिकचा तो क्यूट Video…

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन 

थोडं पण कामाचं

  • थोडं पण कामाचं
  • कार्तिक आर्यनचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • व्हिडिओच्या बॅकग्राउंडवरुन तो हिमाचल प्रदेशमध्ये असल्याचं समजतयं.
  • कार्तिक आर्यन याने नुकतेच सारा अली खानसोबत एक फिल्मचं शूटिंग पुर्ण केलं आहे.

मुंबई: बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसात अनेक नव्या चेहऱ्यांनी एन्ट्री मारली आहे, पण या नव्या चेहऱ्यांमध्ये अगदी जलद गतीने प्रसिद्धीच्या झोतात एक नाव आलं ते “कार्तिक आर्यन.” प्यार का पंचनामा सिरीज आणि  ’सोनू की टिटू की स्विटी’ या फिल्ममधून त्याला अभिनेता म्हणून ओळख मिळाली. करियरच्या सुरुवातीपासूनच त्याच्या अफेयरच्या बातम्यांनी जोर धरला आहे. सारा अली खान, अनन्या पांडे यांच्यासोबत कार्तिकच्या नात्याच्या अफवा सर्वत्र चर्चेचा विषय बनल्या आहेत. 

सध्या कार्तिक आपल्या अपकमींग फिल्ममुळे चर्चेत आला आहे. सारा आणि कार्तिकचे या फिल्मच्या शुटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तर आता कार्तिकने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यानं एका लहान मुलीचा हात पकडलेला दिसत आहे.

कार्तिकने सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर करत सोबत कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं, “माझ्या नवीन मित्रांसोबत खेळतांनाचे काही आनंदी क्षण” (Playing around with my new bff). तसेच या व्हिडिओमध्ये आपण कार्तिकने एका लहान क्यूट मुलीचा हात पकडलेला दिसत आहे. कार्तिक त्या मुलीला माझा हात सोड असे म्हणतं आहेत. तर ती मुलगी त्याला हात तर तुम्ही पकडला आहे, असं बोलत असल्याचे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. त्यानंतर एक लहान मुलगा मध्ये येऊन त्यांचे हात सोडवतो. हा व्हिडीओ चाहत्यामध्ये खूप पसंत केला जात असून फॅन्स कार्तिक हा सर्वात डाऊन टू अर्थ सेलिब्रिटी असल्याचे सांगत आहेत.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Playing around with my new bff

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

फिल्मच शुटिंग संपलं

कार्तिक आणि सारा अली खान यांच्या आगामी फिल्मच्या शूटिंगचे नकतेच पॅकअप झालं, फिल्म सेटवरचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. कार्तिक आणि सारा यांच्यातील रोमॅंटिक केमेस्ट्री या व्हायरल फोटो मधून आपण पाहू शकतो. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सारा आणि आर्यनने शुटिंग संपल्यानंतर फिल्मसेटवरील हे रोमॅंटीक फोटो पोस्ट केले आहेत.

या फिल्मचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली करत आहेत. त्यांनी या आधी जब वी मेट, लव आज कल, हायवे, रॉकस्टार, तमाशा सारख्या हिट फिल्म भारतीय सिने जगताला दिल्या असून या फिल्म अॅवॉर्डसाठी बेस्ट डायलॉग, बेस्ट स्क्रिन प्ले, बेस्ट डायरेक्टर नामांकनं मिळाली आहेत. तसेच इम्तियाज अली यांना  २०१० मध्ये लव आज कल फिल्मसाठी ड्रिम डायरेक्टर तर २०१४ मध्ये हायवे फिल्मसाठी बेस्ट डायरेक्टर असे दोन स्टार डस्ट अॅवॉर्डस् आणि २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या रॉकस्टार फिल्मसाठी बेस्ट डायरेक्टरचा झी सिने अॅवॉर्ड मिळाला आहे. इम्तियाज अली इमोशनल ड्रामा, लव स्ट्रोरीस् आपल्या फिल्ममधून कुशलतेनं मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रत्येक फिल्ममध्ये कोमल प्रेमाचा साधेपण नेहमीच जपण्याचा प्रयत्न केला आहे. 

आता इम्तियाज अली पुन्हा एकदा असाच एक भन्नाट सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. २००९ मधील सुपर हिट “लव आज कल” या त्यांच्या फिल्मचा हा सिक्वल असणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. आर्यन-साराची प्रमुख भुमिका असलेल्या या सिनेमाचे शुटिंग त्यांनी दिल्ली, मुंबई आणि हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास ६६ दिवस चाललं. तसेच या सिनेमात सारा आणि आर्यन यांच्यासह रणदीप हुड्डाही या सिनेमात महत्वाची भूमिकेत दिसणार आहे. या फिल्मचे टायटल काय असणार यावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

 

 

 

 

दोस्ताना २ मध्येही कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन लवकरच 'दोस्ताना' फिल्मचा सिक्वल 'दोस्ताना २' मधूनही चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. तर या फिल्ममध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर त्यांच्या सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.     

 

 

 दोस्ताना २ शिवाय “पति पत्नी और वो” च्या सिक्वल फिल्ममध्येही कार्तिक आर्यन झळकणार आहेत. तर पति पत्नी और वोच्या सिक्वल फिल्ममध्ये भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे या दोघी कार्तिकसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. तसेच या फिल्मचा फस्ट लूक नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[Video]: सारा नाही 'ही' आहे माझी बेस्टफ्रेंड: कार्तिक आर्यन, पहा व्हायरल व्हिडिओ Description: कार्तिकने केला इंस्टाग्रामवर क्यूट व्हिडिओ पोस्ट, या व्हिडिओत कार्तिक एका गोंडस मुलीचा हात पकडताना दिसत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंटेस् वर्षाव केला आहे. पहा मस्तीखोर पण प्रेमळ कार्तिकचा तो क्यूट Video…
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles