Freddy to release on OTT : कार्तिक आर्यनचा नवा सिनेमा 'फ्रेडी' थिएटरमध्ये नाही तर, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

बी टाऊन
Updated Oct 27, 2022 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Freddy to release on OTT : 'भूल भुलैया 2' सिनेमातून धुमाकूळ घातल्यानंतर आता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) ओटीटीवर धुमाकूळ घायायला सज्ज झालेला आहे. कार्तिक आर्यनचा नवा सिनेमा 'फ्रेडी' (Freddy) थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Kartik Aryan starrer Freddy to release on OTT
कार्तिकचा 'फ्रेडी' थिएटरमध्ये नाही, ओटीटीवर रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कार्तिक आर्यनचा नवा सिनेमा 'फ्रेडी'ची उत्सुकता
  • थिएटरमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार फ्रेडी
  • थ्रीलर आहे कार्तिक आर्यनचा नवा सिनेमा 'फ्रेडी'

Freddy to release on OTT : कार्तिक आर्यन (Kartik Aryan) त्याच्या आगामी फ्रीडे या सिनेमावर काम करत आहे. कार्तिक आर्यनचा हा सिनेमा आधी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, आता कार्तिकचा सिनेमा फ्रीडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा OTT वर रिलीज (OTT release) करण्याचे कारण काय आहे ते जाणून घ्या. (Kartik Aryan starrer Freddy to release on OTT) 

कार्तिक आर्यन ज्या प्रकारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे ते कौतुकास्पद आहे. कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. या वर्षातील बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.कार्तिक आर्यनचा अभिनयही लोकांना खूप आवडतो. आतापर्यंत त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. त्याच्या भूमिका प्रेक्षकांनाही आवडलेल्या आहेत. आता कार्तिक फ्रेडी या थ्रीलर सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र, हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

अधिक वाचा : 'आई कुठे काय करते'मध्ये ट्विस्ट पे ट्विस्ट

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार सिनेमा

तसं पाहता, कार्तिक आर्यनचा हा सिनेमा आधी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, आता निर्मात्यांनी त्याच्या रिलीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कार्तिकचा फ्रेडी सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. मात्र, रिलीजच्या तारखेबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. सिनेमाच्या रिलीजबद्दल  कार्तिक म्हणाला, "मी फ्रेडी या सिनेमाचा एक भाग आहे यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो, सिनेमाची कथा खूपच वेगळी आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार्‍या या सिनेमाची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि आशा करतो की प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल."

अधिक वाचा :  अभिषेक बच्चनच्या सायकोलॉजिकल वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज


कार्तिकची व्यक्तिरेखा वेगळी असेल

कार्तिक आर्यनचा हा सिनेमा थ्रीलर असणार आहे. अशा भूमिकेत प्रेक्षकांनी कार्तिकला कधीच पाहिलेलं नसेल. कार्तिकसोबत या सिनेमात आलिया एफ दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि नॉर्दन लाइट्स फिल्म्स निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक घोष करत आहेत. 

भूल भुलैया 2 सिनेमाने बॉक्सऑफिसवर धमाल केली होती. हा सिनेमा कॉमेडी हॉरर होता. कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. कार्तिकची धमाल कॉमेडी स्टाइल चाहत्यांना आवडली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कार्तिकच्या या सिनेमाची त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे. आता हा थ्रीलर सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशीच आशा करूया. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी