Kapil Sharma : लालबाग-परळमधील हॉट अभिनेत्री भडकली कपिल शर्मावर

बी टाऊन
Updated Sep 23, 2022 | 18:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kashmira Shah on Kapil Sharma :कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The kapil sharma show) सपना या कॅरेक्टरच्या रूपात चाहत्यांनी कृष्णा अभिषेकला (krushna abhishek)पाहिले आहे. मात्र या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक शोमध्ये नाही. चाहत्यांना त्याची कमी जाणवत आहे. अलीकडेच एका पार्टीदरम्यान मीडियाने कृष्णाला याबाबत विचारले असता, त्याची पत्नी कश्मीरा शाहने (kashmira shah) अशी प्रतिक्रिया दिली.

Kashmira shah gets angry on Kapil sharma video viral
'ही' अभिनेत्री का भडकली कपिल शर्मावर?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कपिल शर्मावर का भडकली कश्मीरा शाह
  • कृष्णा अभिषेकने सांगितले कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण
  • कश्मीराच्या या कृत्यावर सारेच आश्चर्यचकित

Kashmira Shah on Kapil Sharma : कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The kapil sharma show) सपना या कॅरेक्टरच्या रूपात चाहत्यांनी कृष्णा अभिषेकला (krushna abhishek) पाहिले आहे. मात्र या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक शोमध्ये नाही. चाहत्यांना त्याची कमी जाणवत आहे. अलीकडेच एका पार्टीदरम्यान मीडियाने कृष्णाला याबाबत विचारले असता, त्याची पत्नी कश्मीरा शाहने (kashmira shah) अशी प्रतिक्रिया दिली. (Kashmira shah gets angry on Kapil sharma video viral)

'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा स्मॉल स्क्रीनवर दाखल झालेला आहे. हा शो प्रेक्षकांना पोटधरून हसवत आहे. यावेळी या शोमध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. 
मात्र, त्यादरम्यान सपनाची भूमिका करणाऱ्या कृष्णा अभिषेकची कमी प्रेक्षकांना जाणवत आहे. सुनील ग्रोव्हर, अली असगर यांच्यानंतर कृष्णा अभिषेकनेही कपिल शर्माचा शो सोडला. करारावरून काहीतरी बिनसल्याने शो सोडल्याचं म्हटलं जात असलं तरी खरं कारण काय हे जाणून घेण्याचा सारेच प्रयत्न करत आहेत. एका पार्टीदरम्यान कृष्णाला कपिल शर्माच्या शोबद्दल विचारण्यात आले. कृष्णाने सांगण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र, त्याचवेळी कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह कपिल शर्माचं नाव ऐकताच खूप भडकली. तिने मीडियासमोर जे कृत्य केलं ते पाहून सारेच आश्चर्यचकीत झाले. 

अधिक वाचा : का होतेय सारा अली खान ट्रोल?

कश्मीरा शाहने कॅमेरासमोर केले असे कृत्य

कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडेच कृष्णा अभिषेक पत्नी कश्मीरा शाहसोबत वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. यावेळी मीडियाने कपिल शर्माचे नाव घेताच कश्मीरा शाह खूपच भडकली. कृष्णा अभिषेकने कपिल शर्माचा शो का सोडला? हे जाणून घेण्यासाठी मीडियाने कृष्णाला प्रश्न विचारला. मात्र, प्रश्न ऐकून कश्मीराचा पारा आणखीनच वाढला. तिने चक्क माईक ढकलायला सुरुवात केली. कृष्णा अभिषेकही कश्मीराच्या या कृत्याने हैराण झाला. 

अधिक वाचा : शिल्पा शिंदेचा धमाकेदार Performance; पहा एक झलक

कृष्णा अभिषेकने सांगितले कपिल शर्माचा शो सोडण्याचे कारण 

कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या मीडियामध्ये काही दिवसांपूर्वी येत होत्या. त्यामुळेच कृष्णाने कपिल शर्माचा शो सोडल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, कृष्णा अभिषेकने या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. कृष्णाने हे स्पष्ट केले आहे की, "कपिल शर्मासोबत माझे भांडण नाही, करारामुळेच कृष्णाने कपिल शर्मा शो सोडला. आम्ही एक कुटुंब आहोत, या नाहीतर दुसऱ्या शोमध्ये नक्कीच एकत्र काम करू" असं सांगायलाही कृष्णा अभिषेक विसरला नाही. 

'द कपिल शर्मा शो'चा पहिला एपिसोड १० सप्टेंबर २०२२ स्मॉल स्क्रीनवर दाखल झाला. पहिल्या भागात गेस्ट म्हणून, 'कॉमनवेल्थ गेम्स' 2022 मध्ये पदक जिंकणारा खेळाडू होते. यानंतर, अक्षय कुमारसह अनेक स्टार्स कपिलच्या शोमध्ये आले. मात्र, सोशल मीडियावर कपिलच्या या शोला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींना हा शो खूपच आवडत आहे, तर काहींनी मात्र, शोकडे पाठ फिरवली आहे. अली असगर, भारती सिंग, कृष्णा अभिषेक या कॉमेडियन्सना प्रेक्षक शोमध्ये खूप मिस करत असल्याची प्रतिक्रिया चाहते सोशल मीडियावर देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी