Phone Bhoot movie review: कतरिना-सिद्धांत आणि इशानचा 'फोनभूत' प्रेक्षकांसाठी 'हॉरर', ... नुसता मनस्ताप

बी टाऊन
Updated Nov 04, 2022 | 17:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Phone Bhoot movie review: कतरिना कैफ (Katrina kaif), इशान खट्टर (Ishaan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (siddhant) स्टारर 'फोनभूत' सिनेमाची स्टोरीलाईन चांगली आहे. पण हा सिनेमा म्हणावा तसा खुलवता आलेला नाही. दोन मुलगे.. एका स्त्री भूतासोबत धमाल आणि मस्ती करत आहेत ही आहे सिनेमाची वनलाईन स्टोरी.. मात्र, हा सिनेमा म्हणजे डोक्याला ताप असल्याचं म्हटलं जात आहे.

katrina Ishaan siddhant starrer Phone Bhoot movie review
'फोनभूत' प्रेक्षकांसाठी 'हॉरर'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'फोनभूत' प्रेक्षकांसाठी 'हॉरर'
  • कतरिना-इशान-सिद्धांतची केमिस्ट्री अपयशी
  • वैविध्य दाखवण्याच्या नादात सिनेमा फसला

Phone Bhoot movie review: कतरिना कैफ (Katrina kaif), इशान खट्टर (Ishaan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (siddhant) स्टारर 'फोनभूत' सिनेमाची स्टोरीलाईन चांगली आहे. पण हा सिनेमा म्हणावा तसा खुलवता आलेला नाही. दोन मुलगे.. एका स्त्री भूतासोबत धमाल आणि मस्ती करत आहेत ही आहे सिनेमाची वनलाईन स्टोरी.. मात्र, हा सिनेमा म्हणजे डोक्याला ताप असल्याचं म्हटलं जात आहे. यापेक्षाही एखादा चांगला सिनेमा कतरिना कैफला सेकंड इनिंग सुरू करण्यासाठी करता आला असता. सिनेमाची वनलाईन चांगली असली तरी तिची मांडणी हवी तशी जमलेली नसल्याचं मत समीक्षकांनी व्यक्त केलं आहे. (katrina Ishaan siddhant starrer Phone Bhoot movie review)

अधिक वाचा : एका अजब लग्नाची गजब गोष्ट

गुल्लू (इशान खट्टर) आणि मेजर (सिद्धांत चतुर्वेदी) यांना हॉरर सिनेमा आवडतो. अर्थात त्याचं कारण आहे त्यांचं बॅचलर लाईफ. या दोघांच्या रुममधील इंटिरिअर पण तसंच आहे. दिवे, मास्क, आणि गूढ वातावरण या दोघांनी त्यांच्या रुममध्ये तयार केल्याचं या सिनेमात दिसतंय. कारण, गुल्लू आणि मेजर यांना त्यांच करिअरही यातच करायचं आहे. तसं पाहता, भूतांना पळवणं, भूतांच्या मागे लागणं, भूतावरून इतरांना घाबरवणं, एखाद्याला भूतबाधा झाल्याचं सांगत ती उतरवणं हे काही नवीन नाही. अगदी, उदाहरणंच द्यायचं
झालं तर हॉलिवूडचा सिनेमा 'घोस्टबस्टर'चं उदाहरण देता येईल. या सिनेमाचे सगळे सिक्वेल हीट झाले होते. एखाद्या सिनेमाची गोष्ट कॉपी करणं यात काही गैर नाही, पण ती गोष्ट तेवढ्याच कल्पकतेने आणि तितक्याच दमदारपणे सादर करणं हे चॅलेंज आहे,  आणि ती गोष्ट सांगत असताना प्रेक्षकांना हसवणं हे मुळात जमायला हवं. 

रागिणी (कतरिनी कैफ) हे एका मिशनवर असलेलं भूत आहे हे सिनेमा पकड घेण्याआधीच रिव्हिल होतंय. त्यामुळे सिनेमाची मजाच निघून जाते. एखाद्या चांगल्या लिहिलेल्या भूमिकेचं कतरिना कैफ सोनं करू शकते हे तिने याआधीही दाखवून दिलेलं आहे. 2018 साली आलेला 'झिरो'सिनेमा आठवत असेल तर त्यात एक कतरिना कैफ सोडल्यास दुसरं काहीही पाहण्यासारखं नव्हतं. या सिनेमात सिल्के लेदर, बूट, बॅग, आणि धमाकेदार डायलॉग्ज कतरिनाच्या वाट्याला आलेले आहेत. या डायलॉग डिलीव्हरीच्या माध्यमातून कतरिनाला तिची भूमिका खूप जास्त नीट करता आली असती. अर्थात त्याचा परिणाम सिनेमावर झाल्याचं दिसतंय. 

सिनेमातील इतर पात्रांच्या बाबतीतही अपेक्षाभंग झाला. सिनेमात जॅकी श्रॉफ आत्माराम या राक्षसाच्या भूमिकेत दिसत आहे. हा असा राक्षस आहे जो 'मोक्ष' हवा असलेल्या गरीबांना त्रास देत असतो. तर शीबा चड्ढा भूताच्या व्यक्तीरेखेत आपल्यासमोर येते खरी पण इथेही घोर निराशाच पदरी येते. बंगाली लेहजात हिंदी बोलणारं हे भूत आपली निराशा करतं. शीबाच्या डायलॉग्जपेक्षा तिचा मेकअपच उठून दिसतो. 

अधिक वाचा : Mili screening: विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं

आता तुम्ही म्हणाल, भूत बंगाली का? तर आम्ही तु्म्हाला सांगतो, लेखक भूतांमध्येही राष्ट्रीय एकात्मता दाखवण्यावर जोर देत आहे. त्यामुळेच गुल्लू तमिळ बोलत आहे. तर मेजर पंजाबी आहे. तर मध्येच काही भूतं भांगडा करताना तुम्हाला दिसतात. सिनेमात वैविध्य दाखवण्यााठी नुसती खिचडी केल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर सिनेमात भूतांची असेंबलीही दाखवण्यात आली आहे. या सगळ्यात जॅकी श्रॉफ थोड्याफार प्रमाणात विनोद करताना दिसतो. जग्गू दादाचं टपोरी बोलणं, आपल्या गुंडांना भिडू म्हणून हाक मारणं, हेच काय ते सुखावह. 

एकूणंच सिनेमात खूप काही दाखवण्याच्या नादात मूळ सिनेमाची गोष्ट, त्याचा आत्माच कुठेतही भटकल्याचं चित्र समोर उभं राहतं. कतरिना, ईशान आणि सिद्धांतसारखी तगडी 
स्टारकास्ट असूनही सिनेमा आपली छाप पाडण्यात सपशेल अपयशी ठरतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी