Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | लग्नाला १२५ व्हीआयपी, ताज आणि ओबेरॉयमध्ये बुकिंग, ४० लक्झरी कार

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 14, 2021 | 17:08 IST

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नासाठी या हॉटेलांमधून १२५ बॉलीवूड सेलिब्रिटींचा मुक्काम होण्याची शक्यता आहे. याचबरोबर सर्व पाहुण्यांना एअरपोर्टवर घेऊन जाण्यासाठी आणि सोडण्यासाठी एका ट्रॅव्हल कंपनीकडून जवळपास ४० आलिशान कारची तयारी करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये ऑडी, रेंज रोव्हरसहीत अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding
कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न 
थोडं पण कामाचं
  • कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा
  • हॉटेल सिक्स सेन्स बरवाडा फोर्टमध्ये लग्नाची जोरदार तयारी
  • सर्व पाहुण्यांना एअरपोर्टवर घेऊन जाण्यासाठी आणि सोडण्यासाठी जवळपास ४० आलिशान कार

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | मुंबई : बॉलीवूडची स्टार कतरिना कैफ (Katrina Kaif)आणि विकी कौशल (Vicky Kaushal)हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बॉलीवूडच्या (Bollywood Star) या स्टार जोडीची खूपच चर्चा होते आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विकी कौशल आणि कतरिना कैफ पुढील महिन्यात लग्नबंधनात (Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding)अडकणार आहेत. हॉटेल सिक्स सेन्स बरवाडा फोर्टमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. चौथ माता ट्रस्ट आणि हॉटेल शिवप्रिया पॅलेसमध्ये ४२ खोल्यांची बुकिंग झाल्यानंतर आता सवाई माधोपूर रणथंबोर रोडवर ५ स्टार हॉटेल ताज आणि द ऑबेरॉयमध्येदेखील पाहुण्यांसाठी बुकिंग करण्यात आले आहे. (Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding preparation in full rush, 125 VIP, 40 luxury cars)

व्हीआयपी, आलिशान गाड्या

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नासाठी या हॉटेलांमधून १२५ बॉलीवूड सेलिब्रिटींचा मुक्काम होण्याची शक्यता आहे. याचबरोबर सर्व पाहुण्यांना एअरपोर्टवर घेऊन जाण्यासाठी आणि सोडण्यासाठी एका ट्रॅव्हल कंपनीकडून जवळपास ४० आलिशान कारची तयारी करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये ऑडी, रेंज रोव्हरसहीत अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

इव्हेंट कंपन्यांकडून हॉटेल शोध

हॉटेल रीजेंटा वन्य महलचे मॅनेजर शुलाउद्दीन खान यांनी सांगितले की जंगल सफारी बुकिंगसाठी इव्हेंट टीमशी चर्चा सुरू आहे. त्यांनी सांगितले की पुढील एक किंवा दोन दिवसात यासंदर्भातील डील निश्चित होईल. अशावेळी इव्हेंट कंपन्यांना बजेटमुळे थोड्या अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. रणथंबोरमध्ये कमी बजेटवाले हॉटेल यांची याआधीच टायगर सफारी आणि लग्नाच्या सीझनमुळे बुकिंग झाली आहे. सध्या इव्हेंट कंपन्यांकडून आणखी हॉटेलचा शोध घेतला जातो आहे.

लग्नासाठी असणार तीन स्तरांची सुरक्षा

कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नासाठी इव्हेंट कंपन्यांकडून हॉटेल रीजेन्सी आणि सवाई विलाससाठी बोलणी सुरू आहेत. तर हॉटेल रीजेन्सीच्या ६० खोल्या बुक झाल्याची माहिती समोर येते आहे. हॉटेलकडून मात्र यासंदर्भात माहिती देण्यास टाळण्यात येते आहे. पाहुण्यांची प्रायव्हसी जपण्याचा हॉटेलकडून प्रयत्न केला जातो आहे. विकी-कतरिनाचे मॅनेजर आणि इव्हेंट कंपन्या सुरक्षेसाठी लवकरच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि लग्नाशी संबंधित केटरिंग, सुरक्षा व्यवस्था यासाठी एक बैठक घेणार आहेत. या काळात सर्व खास पाहुण्यांसाठी तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे. यामध्ये पहिल्या स्तरावर राजस्थान पोलिसांचे जवान, दुसऱ्या स्तरावर सिक्स सेन्स कंपनीचे सुरक्षा रक्षक आणि तिसऱ्या स्तरावर सेलिब्रिटिंचे बॉडीगार्ड आणि बाउन्सर असणार आहेत.

बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचे लग्न हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. त्यात विकी कौशल आणि कतरिना कैफ हे दोघेही अत्यंत लोकप्रिय कलाकार असल्याने त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या लग्नाला अनेक व्हीआयपी आणि सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी