Katrina and Vicky will tie the knot today : कतरिना कैफ आणि विकी कौशल आज लग्नबंधनात अडकणार, यावेळी घेणार सात फेरे!

Katrina and Vicky to tie the know today : कतरिना कैफ आणि विकी कौशल आज म्हणजेच 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दुपारी 3.30 ते 3.45 च्या दरम्यान सात फेरे होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Katrina kaif and Vicky kaushal to tie the knot today
विकी कौशल-कतरिना कैफ बांधणार साताजन्माची गाठ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विकी कौशल-कतरिना कैफ बांधणार लग्नगाठ
  • दुपारच्या सुमारास घेणार सात फेरे
  • लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ विकणार

Katrina kaif and Vicky kaushal wedding update: अखेर तो दिवस आला ज्याच्यी फॅन्स वाट पाहात होते. रिपोर्ट्सनुसार आज विकी कौशल आणि कतरिना कैफ आज सात फेरे घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आज म्हणजेच 9 डिसेंबरला हे दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीमधील बड्या स्टार्सपासून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक या लग्नाला हजर असल्याच्या बातम्या येत आहेत. 

मीडिया रिपोर्टुसनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना एक खास कोड देण्यात आला आहे. हा कोड दाखवूनच पाहुण्यांना लग्नासाठी प्रवेश घेता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मात्र, या लग्नाबाबत आणखी काही मोठ्या बातम्याही समोर येत आहेत . मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ एका खास वेळेत सात फेरे घेतील. असे सांगितले जात आहे की विकी कौशल आणि कतरिना कैफ आज दुपारी ठीक 3:30 ते 3:45 च्या दरम्यान सात फेरे घेतील आणि साताजन्माची गाठ बांधणार आहेत. 

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात पाहुण्यांना मोबाईल फोन वापरण्यास मनाई असेल. बातमीनुसार, याचे कारण म्हणजे विकी कौशल आणि कतरिना त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ विकणार आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ Amazon Prime Video ला 80 ते 100 कोटी रुपयांमध्ये विकणार आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही जंगल सफारीवर नेण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी