Katrina kaif leaves to Rajsthan for wedding : सध्या बॉलिवूडमध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची. त्यांच्या लग्नाची छोट्यात छोटी अपडेट कव्हर केली जात आहे. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कतरिनाचे कर्मचारी कतरिनाच्या कुटुंबीयांचे, तिचे सामान गाडीत ठेवताना दिसत आहेत. यावरूनच कतरिना लग्नासाठी राजस्थानला रवाना होत असल्याचं म्हटलं जातंय.
अखेर तो दिवस आला आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या लग्नांपैकी एक, कतरिना कैफ आणि विकी कौशलचं लग्न. लग्नसोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. राजस्थानमध्ये जोडप्याच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी दोघंही निघण्याच्या तयारीत असताना त्यांचे कुटुंबीय सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कतरिनाचे कर्मचारी कुटुंबीयांचं, पाहुण्यांचं सामान गाडीत ठेवताना दिसत आहेत. कतरिना आणि तिचे कुटुंबीय कधीही राजस्थानला रवाना होऊ शकतात, हे व्हिडिओ पाहून स्पष्ट होत आहे. व्हिडिओमध्ये, तुम्ही कॅटरिना कैफचे 4 कर्मचारी गाडीत अनेक सुटकेस ठेवताना पाहू शकता, आता हे पाहून कोणीही सांगू शकेल ही सारी लग्नाची तयारी आहे.
रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फंक्शन उद्यापासून म्हणजेच 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि 9 डिसेंबरला कतरिना आणि विकी सात फेरे घेतील, आणि आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील.कतरिना आणि विकीचे लग्न हे 2021 मधील सर्वात मोठे लग्न मानले जात आहे.
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा हॉटेलमध्ये दोघांचे लग्न होणार आहे. दुसरीकडे, आदल्या दिवशी कतरिना कैफ आणि तिचे कुटुंबीय विकी कौशलच्या घरी जाताना दिसले. यावेळी कतरिना पारंपारिक पोशाखात दिसली. यावेळी कतरिनाने मीडियाला पाहून स्माईल दिल्याचंही म्हटलं जातंय. मात्र, या दोघांनी लग्नाबाबत आतापर्यंत मौन बाळगले आहे.