रणबीर-आलियाच्या नात्यावर तर दीपिकाच्या लग्नाला हजेरी लावण्यावर कतरिना व्यक्त होते तेव्हा

बी टाऊन
Updated Apr 29, 2019 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

कतरिना कैफ ही ए लिस्ट स्टार पैकी एक आहे. मध्यंतरी स्वतःच्या आयुष्यात आलेल्या वादळानंतरही ती इंडस्ट्रीत ठाम उभी आहे या बद्दल तिचं कौतुक झालं. नुकतीच ही अभिनेत्री तिच्या या ब्रेकअपबद्दल व्यक्त झाली ती अशी.

Katrina Kaif on breakup with Ranbir Kapoor and how her mother handled it
रणबीर-आलियाच्या नात्यावर तर दीपिकाचं लग्नाला जाण्यावर कतरिना व्यक्त होते तेव्हा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: कतरिना कैफ हिचा झिरो सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटलाच, पण तिच्या कॅरेक्टरचं बऱ्यापैकी कौतुक केलं गेलं. कॅटने साकारलेल्या बबीता कुमारी या पात्राची तुलना तिच्या खऱ्या आयुष्यातल्या घटनेशी केली गेली. सिनेमात बबिताचं ब्रेकअप झाल्याचं दाखवलं आहे आणि त्यातून बबिता कशी दारुच्या आहारी जाते असं सुद्धा दर्शवलं आहे. या सगळ्यावर कतरिनाला विचारता मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कतरिना बऱ्याच दिवसाने मोकळपणाने व्यक्त झाली आणि म्हणाली की ती बऱ्याचदा अनेक भूमिका स्वत:च्या अनुभवातून उभ्या करते तशीच ही भूमिका सुद्धा केली. तिला आलेले अनुभव, तिच्या अवती भवती होणाऱ्या गोष्टी तिच्या सिनेमांच्या भूमिकेसाठी तिला मदत करतात.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

पुढे तिच्या आणि रणबीरच्या ब्रेकअपबद्दल सुद्धा ती खुलेपणाने बोलली आणि म्हणाली, “मला स्वतःला तोडून पुन्हा उभं करावं लागलं, मला पुन्हा एकदा जे काही झालं त्यातून जावं लागलं... नात्यातील माझ्या बाबतीतली जबाबदारी मलाच घ्यावी लागली, मी काय अधिक योग्य किंवा बरोबर करु शकले असते याचा विचार मी केला... आणि त्यात मी ज्या गोष्टींसाठी जबाबदार नव्हते तो माझा प्रॉब्लेम नव्हता. एक गोष्ट जी त्या वेळेस मला खूप मदतीची ठरली मी खचले असताना सुद्धा माझ्या आईचे शब्द माझ्यासोबत होते, ती तेव्हा म्हणाली की इतक्या मुली आणि बायको आहेत ज्या तुझ्यासारख्याच परिस्थितीतून जात आहेत, तुला वाटतं तू एकटी आहेस, पण तसं नाहीये, तिचे हे शब्द मला खूप धीर देऊन गेले.”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

कॅटने मनमोकळेपणाने नात्यावर भाष्य तर केलं पण तिने कोणाचं नाव घेतलं नसलं तरी हे सगळं रणबीरबद्दल आहे हे तर अगदी सरळ आहे. प्रेमात इतका मोठा धक्का बसल्यावर सुद्धा कॅटचा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाहीये असं कॅटचं मत आहे आणि यावर बोलताना ती म्हणाली, “ मी कायमच भावनिक राहीले आहे, माझी रास कर्क आहे आणि म्हणूनच मी फारच हळवी आहे. त्यामुळे ही गोष्ट मी कोणासाठीच सोडणार किंवा बदलणार नाही, पण एक गोष्ट मला कळली आहे की एक स्त्री म्हणून मला स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख राखून ठेवावी लागणार आहे. मी असं म्हणत नाहीये की सतत प्रेमात पहारा देत राहा, प्रेम करा पूर्ण मनापासून करा. एका रिलेशनशिपमध्ये असणं फारंच सुंदर गोष्ट आहे. एका व्यक्तीला द्यायला माझ्याकडे खूप आहे, पण आता मला कळलं आहे की माझं अस्तित्व दुसऱ्या कोणावर अवलंबून नसून फक्त माझ्यावर आहे.”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

आलिया आणि रणबीर सध्या रिलेशनमध्ये असल्याचं जवळपास पक्कं झालं आहे, पण या आधी आलिया-कतरिना खूप छान मैत्रीणी होत्या आणि कायम एकत्र पाहिल्या जायच्या आत्या त्यांच्या नात्यात काही बदल झाले आहेत का असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो यावर कतरिना म्हणाली, “रणबीर आणि आलियासोबत माझं वेगवेगळं नातं आहे, जे मी काही झालं तरी कायम ठेवणार आहे, त्या दोघांचं माझ्या आयुष्यात आपआपलं एक वेगळं स्थान आहे. त्या दोघांबद्दल मला एक व्यक्तिगत वेगळी आत्मियता आहे त्यामुळे ते दोघं मला जेव्हापण भेटतात मी त्यांना माझ्या मनाला जसं वाटतं तशी सामोरी जाते आणि भेटते.”

याचसोबत कतरिनाला रणबीरची एक्स दीपिका जिच्यासोबत कॅटचं कधी पटलं नाही तिच्या लग्नाला हजेरी लावण्याबाबद विचारता ती म्हणाली की मी आयुष्यात फार पाहिलंय आणि आणि मला अजून हेवेदावे धरुन ठेवायचे नाहीयेत. असं म्हणत कतरिनानं तिच्या आयुष्यात झालेल्य़ा ब्रेकअपला मागे टाकत नव्याने पुढे जाण्याचं ठरवल्याचं या मुलाखतीतून सिद्ध केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी