Katrina Kaif baby bump picture went viral: कतरिनाचा कैफच्या 'बेबी बंप'मुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण, व्हायरल झाला फोटो

बी टाऊन
Updated Nov 14, 2022 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Katrina Kaif baby bump picture went viral: कतरिना कैफचा (Katrina Kaif) एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती प्रेग्नंट दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर ही अभिनेत्री लवकरच विकी कौशलच्या (Vicky kaushal) बाळाची आई होणार असा अंदाज चाहते लावत आहेत. मात्र, या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे.

katrina kaif pregnannt her baby bump photo viral on social media
काय आहे कतरिनाच्या बेबी बंपमागचं सत्य?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काय आहे कतरिनाच्या बेबी बंपमागचं सत्य?
  • मेरी ख्रिसमस सिनेमात कतरिना साकारतेय प्रेग्नंट महिलेची व्यक्तीरेखा
  • सिनेमाच्या शूटिंगचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण

Katrina Kaif baby bump picture went viral: कतरिना कैफचा (Katrina Kaif)  एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती प्रेग्नंट दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर ही अभिनेत्री लवकरच विकी कौशलच्या (Vicky kaushal) बाळाची आई होणार असा अंदाज चाहते लावत आहेत. मात्र, या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे. (katrina kaif pregnannt her baby bump photo viral on social media)

अधिक वाचा : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

रणबीर कपूर-आलिया भट्ट (Ranbir kapoor-alia bhatt) आणि बिपासा बसू-करण सिंग ग्रोव्हर (Bipasha basu-karan singh grover) यांच्या घरी पाळणा हलल्यानंतर आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे विकी कौशल (Vicky kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या बाळाची. हे दोघे कधी गुड न्यूज देणार याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या फोटोमुळे पुन्हा एकदा कतरिना कैफच्या प्रेग्नंसीची बातमी चर्चेत आली आहे.या फोटोमध्ये कतरिना कैफचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे. काय आहे हे या फोटोमागचं सत्य हे तुम्हीही जाणून घ्या. 

ज्यांनी कतरिना कैफचा हा लेटेस्ट फोटो पाहून अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला आहे, त्यांचा आता हिरमोड होणार आहे. कारण, कतरिना प्रेग्नंट नाही, म्हणजे खऱ्या आयुष्यात कतरिना प्रेग्नंट नाही. अजूनही कळलं नाही ना, थांबा जास्त विचार करू नका, आम्हीच तुम्हाला खरी बातमी काय आहे ते सांगतो. हा फोटो कतरिना कैफच्या बहुचर्चित 'मेरी ख्रिसमस'  (Merry Christmas ) या सिनेमातील आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल झाले. त्यात कतरिनाचा हा बेबी बंपचा फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं. 'मेरी ख्रिसमस' या सिनेमात कतरिना तिच्या करिअरमधील सर्वात कठीण भूमिका साकारत आहे. या सिनेमात कतरिना प्रेग्रंट महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा फोटो कतरिना कैफच्या 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ETimes (@etimes)

अधिक वाचा :  ग्रीन कॉफी एवढी लोकप्रिय का होतेय?

सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो आहे. या सिनेमात कतरिना प्रेग्ंनट महिलेची भूमिका साकारत असल्याने तिने तसा गेटअप केलेला आहे. साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती 'मेरी ख्रिसमस' या सिनेमात कतरिना कैफसोबत दिसणार आहे. विजय सेतुपतीचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशलने लग्न केले. पुढल्या महिन्यात हे कपल त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेत. कतरिना कैफच्या प्रेग्नंसीबाबत याधाही अनेक अफवा पसरल्या होत्या. या कपलच्या जवळच्या एका सूत्राने असेही सांगितले होते की, कतरिना आणि विकीकडे अशी काही गुड न्यूज असेल तर ते स्वत: त्याची घोषणा नक्कीच करतील. सध्या दोघेही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहेत. नुकताच कतरिना कैफचा फोनभूत हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरला.सिनेमाने फारशी कमाई केलेली नाही. या सिनेमाच्या रिलीजनंतर आता लगेचच कतरिना 'मेरी ख्रिसमस'चं शूटिंग करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी