आधी ब्रेकअप आणि आता 3 वर्षानंतर एकत्र दिसणार रणबीर- कतरिना 

बी टाऊन
Updated Sep 16, 2019 | 23:33 IST

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचं ब्रेकअप होऊन तीन वर्ष झालीत. ब्रेकअप झाल्यानंतर दोघं फक्त जग्गा जासूसमध्ये एकत्र दिसले होते. मात्र त्यानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. आता पुन्हा एकदा ते स्क्रीन शेअर करणार आहे

Katrina Kaif, Ranbir Kapoor
ब्रेकअप आणि आता 3 वर्षानंतर एकत्र दिसणार रणबीर- कतरिना   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड एक्ट्रेस कतरिना कैफ आणि रणबीर कपूर बी-टाऊनमधील हॉटेस्ट कपल्सपैकी एक होतं.
  • २०१६ मध्ये दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
  • कतरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या ऐकून त्यांच्या फॅन्सना देखील शॉक्ड बसला होता.

एक अशी वेळ होती की जेव्हा बॉलिवूड एक्ट्रेस कतरिना कैफ आणि रणबीर कपूर बी-टाऊनमधील हॉटेस्ट कपल्सपैकी एक होतं. दोघांना बऱ्याचदा एकत्रित स्पॉट केला जायचं. २०१६ मध्ये दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. कतरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या ऐकून त्यांच्या फॅन्सना देखील शॉक्ड बसला होता. आता इतक्या वर्षानंतर दोघांनी आपआपल्या आयुष्यात मूव्ह ऑन केलं आहे. मात्र अजूनही या कपलची फॅन फॉलोविंग कमी नाही आहे. ते फॉलोविंग अजूनही त्यांना एकत्र बघू इच्छित असतात. 

आता त्यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कारण कतरिना आणि रणबीर पुन्हा एकदा काम करणार आहे. या कथेत थोडा ट्विस्ट आहे.  यावेळी ते कोणत्याही सिनेमासाठी एकत्र येणार नसून तर अ‍ॅड फिल्मसाठी एकत्र येणार आहेत. रिपोर्ट्सनुसार रणबीर आणि कतरिनाने एका प्रोजेक्टसाठी एकत्रित साईन केले आहे. हा सिनेमा नाही तर मोबाईलची जाहिरात आहे. या वृत्तानुसार, या जाहिरातीमध्ये कतरिना आणि रणबीरची क्वर्की केमिस्ट्री दिसणार असून यात रॅपर किंग बादशाह देखील असेल. 

 

 

यापूर्वी रणबीर आणि कतरिना राजनीती, अजब प्रेम की गजब कहानी आणि जग्गा जासू सारख्या सिनेमांमध्ये दिसले आहेत. या दोन्ही सिनेमाची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. ब्रेकअपनंतर कतरिनाला पुन्हा एकदा रिकव्हर होण्यास थोडा वेळ लागला पण वर्षाच्या सुरूवातीला जेव्हा कतरिना आणि रणबीर एका अ‍ॅवॉर्ड शोमध्ये आमनेसामने आले तेव्हा त्यांनी एकमेकांना मिठी मारली.

 

 

कतरिना नंतर रणबीर आता आपला आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रची को-स्टार आलिया भट्टला डेट करत आहे. ते बर्‍याचदा एकत्र दिसतात. रणबीर त्यांच्या नात्याबाबत आलियाचे वडील महेश भट्ट यांनाही भेटला आहे. रणबीरसोबत वडिलांच्या (ऋषी कपूर) प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलिया न्यूयॉर्कलाही गेली होती. फॅमिली फोटोंमध्येही आलिया दिसली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ranbir Kapoor Fan Club (@ranbirkapoormagic) on

 

कतरिनाबद्दल सांगायचे झाले तर ती सध्या अविवाहित आहे आणि लवकरच सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिची अक्षय कुमारच्या विरूद्ध आहे. रोहित शेट्टीचा सूर्यवंशी 27 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...