Kat-Vicky after marriage : कतरिना कैफने आनंदाने स्वत:च्या हाताने बनवलेल्या गोड शिऱ्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिनाने सासरच्यांसाठी शिरा केला आहे. एका बाऊलमध्ये कतरिनाने हा शिरा सर्व्ह केला आहे. त्याचा फोटो कतरिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मैंने बनाया, चौका चढाना". कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर या जोडप्याने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर कतरिना कैफने तिच्या सासरच्या घरातील स्वयंपाकघरात पहिल्यांदाच पाऊल ठेवले. लग्नानंतर नववधूला काहीतरी गोड बनवायला सांगितले जाते, अशा वेळी कतरिना कैफने गोड शिरा केला आहे.
कतरिना कैफने आनंदाने तिच्या हाताने बनवलेल्या शिऱ्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या शिऱ्यामध्ये कतरिनाने बेदाणेही टाकले आहेत.
एका बाऊलमध्ये कतरिनाने हा शिरा सर्व्ह केला आहे. त्याचा फोटो कतरिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मैंने बनाया, चौका चढाना"
कतरिना कैफचा हा फोटोही चाहत्यांमध्ये व्हायरल होऊ लागला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ नुकतेच त्यांच्या हनिमून ट्रिपवरून परतले आहेत. आता या फोटोवरून स्पष्ट होत आहे की, मुंबईत परतल्यानंतर कतरिना तिच्या सासरच्या लोकांना खुश करण्यात व्यस्त आहे. यापूर्वी, कतरिनाने तिचा प्रोफाइल फोटो बदलून चाहत्यांना खूश केलं आहे.
विकी-कतरिनाचा विवाह 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे झाला. लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लवकरच विकी-कतरिनाच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे.