मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफल कोरोनाचे लागण झाली असून तिने स्वता:ला आयसोलेट केले आहे. कतरिनाने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली आहे. याआधी कतरिनाचा बॉयफ्रेंड विक्री कौशलला सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह झाला असल्याचे वृत्त आले होते. दरम्यान कतरिनाने आपल्या लिहिले आहे की, माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्वता:ला आयसोलेट म्हणजेच अलगीकरण केले आहे आणि सध्या होम क्वारंटीन आहे. मी डॉक्टरांच्या सल्लाने सर्व सेफ्टी प्रोटोकॉल्स फॉलो करत आहे.
कतरिना कैफ यांनी आणखी लिहिलं की, सर्वांना माझी विनंती आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करावी. आपले सर्वांचे प्रेम आणि सर्वांचे पाठिंब्यासाठी मी आभारी आहे. सुरक्षित रहा आणि आपली काळजी घ्या.
याआधी विकी कौशलला कोरोनाची लागण झाली होती. त्यानेही याची माहिती इंस्टाग्रामवरती पोस्ट केली होती. विकी म्हणाला होता की, सुरक्षेचे सर्व नियम पाळले तरी मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे. सध्या मी होम क्वारंटीन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेत असल्याचं सांगितले होतं.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अनेक बॉलिवूडच्या सिने अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भूमी पेडणेकर, अक्षय कुमार, गोविंदा, आलिया भट्ट, अभिजीत सावंतसह अनेकजण कोविड -१९ पॉझिटिव्ह झाले आहेत.