लवकरच मोठ्या पडद्यावर येतंय एक सुंदर भूत

Katrina to play ghost in ‘Phone Bhoot’ : तुम्ही कधी सुंदर भूत पाहिले आहे का? जर नसेल तर आता सज्ज व्हा, कारण लवकरच मोठ्या पडद्यावर येतंय एक सुंदर भूत.

Katrina to play ghost in ‘Phone Bhoot’
लवकरच मोठ्या पडद्यावर येतंय एक सुंदर भूत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • लवकरच मोठ्या पडद्यावर येतंय एक सुंदर भूत
  • 'फोन भूत' हा बॉलिवूडचा हॉरर-कॉमेडी सिनेमा
  • कतरिना कैफ भूताच्या भूमिकेत

Katrina to play ghost in ‘Phone Bhoot’ : तुम्ही कधी सुंदर भूत पाहिले आहे का? जर नसेल तर आता सज्ज व्हा, कारण लवकरच मोठ्या पडद्यावर येतंय एक सुंदर भूत. 'फोन भूत' या हॉरर-कॉमेडी सिनेमात कतरिना कैफ भूताची भूमिका साकारत आहे. या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. 

'फोन भूत' हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे त्यामुळे या चित्रपटाची कथा आणि इतर तपशील याविषयी प्रेक्षकांना बरीच माहिती असली तरी, एक मोठे कुतूहल सिनेमातील भुताच्या पात्राबद्दल दर्शकांमध्ये होते. आता दर्शकांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

बिग बॉसच्या घरात 16 अतरंगी कलाकारांची एंट्री

Shehnaaz Gill troll : साजिद खानला पाठिंबा दिल्याबद्दल शहनाज गिल ट्रोल, चाहत्यांनी सुनावले खडे बोल.

कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. यंदाच्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कतरिनाला पडद्यावर अनोख्या भूमिकेत पाहणे दर्शकांसाठी खूप रोमांचक असेल.

बॉलीवूडमधील महिला सुपरस्टार्सपैकी एक कतरिना आता भूताच्या रूपात वेगळ्या प्रकारची मोहिनी घेऊन येते आहे. ही मोहिनी  रसिकांसाठी एक पर्वणी असेल. फोन भूत हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला सिनेमा आहे. यामुळे रसिकांमध्ये उत्सुकता आहे. अलिकडेच, इंटरनेटद्वारे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सेटवर धमाल करताना दिसले, ज्यामुळे या तिघांना सिनेमात एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित फोन भूत शुक्रवार ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी