Rasik Dave Death : अभिनेते रसिक दवे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन, 'महाभारत'मधील 'नंदा' या व्यक्तिरेखेने प्रसिद्ध झाले

बी टाऊन
Updated Jul 30, 2022 | 16:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rasik Dave Death : टीव्हीसोबतच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसलेली प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे पती आणि सुप्रसिद्ध अभिनेते रसिक दवे यांचे निधन झाले आहे.

Ketaki Dave husband Rasik Dave dies due to kidney failure
अभिनेते रसिक दवे काळाच्या पडद्याआड  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेते रसिक दवे यांचे 65 व्या वर्षी निधन
  • महाभारत मालिकेतील नंदाच्या भूमिकेने प्रसिद्ध
  • हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये साकारल्या भूमिका

Rasik Dave Death : हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये भूमिका केलेले अभिनेते रसिक दवे ( Rasik Dave ) यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेते अनेक दिवसांपासून आजारी होते. या अभिनेत्याने मुंबईत अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे यांनी अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री केतकी दवे ( Ketki Dave ) यांचे ते पती होते.  ( Ketaki Dave husband Rasik Dave dies due to kidney failure ).  


काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती


रिपोर्टनुसार, रसिक दवे जवळपास दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. त्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते.मात्र, गेल्या १५ दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किडनी निकामी झाल्याने रसिक दवे यांचा मृत्यू झाला. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.रसिक हे प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे यांचे पती होते. दोघांना रिद्धी आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत.

अधिक वाचा : पावसाळ्यात खा लसणाची चटणी

  
करिअरची सुरुवात अशी झाली

रसिकने 1982 मध्ये 'पुत्र वधू' या गुजराती चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. गुजराती-हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी उत्तम काम केले, पण त्यांना खरी ओळख 'महाभारत'मधील 'नंदा' या व्यक्तिरेखेतून मिळाली. रसिक दवेने 'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्री केतकी दवेशी लग्न केले.केतकी आणि रसिकची जोडी 'नच बलिये' या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती. केतकीची आई सरिता जोशी याही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. रसिक आणि केतकी दवे यांनी गुजराती थिएटर कंपनीही चालवली.

 

अधिक वाचा : आरबीआयचे तीन सहकारी बॅंकांवर निर्बंध,लाखो खातेधारकांना धक्का


या शोमध्ये काम केले

रसिकने अनेक शोमध्ये काम केले होते. ज्यामध्ये 'संस्कार धरोहर आपन की', 'सीआयडी', 'कृष्णा' आणि 'एक महल हो सपनो का' सारखे अनेक लोकप्रिय टीव्ही शो समाविष्ट आहेत. याशिवाय त्यांनी अनेक गुजराती नाटके, गुजराती चित्रपट आणि अनेक गुजराती मालिकांमध्येही काम केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी