KGF Chapter 2 Record: यश स्टारर 'KGF - Chapter 2' गेल्या आठवड्यात रिलीज झाला. स्क्रीन काउंट, प्रमोशन आणि गुरुवारच्या रिलीजमुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. शानदार ओपनिंगनंतर, यश स्टारर 'KGF 2' ने वेगाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
मात्र, चित्रपटाच्या पहिल्या सोमवारी (18 एप्रिल) कलेक्शनमध्ये पहिल्या रविवारच्या (17 एप्रिल) कलेक्शनपेक्षा जवळपास 50 टक्क्यांनी घसरण झाली. आता पहिल्या मंगळवारी म्हणजेच सहाव्या दिवशी 'KGF - Chapter 2' ने 19.14 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. आतापर्यंत सिनेमाचे एकूण कलेक्शन 238.70 कोटी रुपये झाले आहे.
या बॉक्स ऑफिस रिपोर्टमध्ये आम्ही 'KGF - Chapter 2' ची 2022 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमांशी तुलना करणार आहोत. मंगळवारी १९.१४ कोटी कमावणाऱ्या 'KGF-चॅप्टर २' ने विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स'ला मागे टाकले आहे. अनुपम खेर स्टारर 'द कश्मीर फाइल्स' ने पहिल्या मंगळवारी 2022 मध्ये 18 कोटींची कमाई केली. RRR सिनेमाने 15.02 कोटी रुपये कमवले, गंगूबाई काठियावाडीने 10.01 कोटी रुपये कमावले, बच्चन पांडे सिनेमाने 3.24 कोटी रुपये कमवले आणि बधाई दो सिनेमाने 1.12 कोटींचा गल्ला कमावला होता. या चित्रपटांपेक्षा केजीएफ चॅप्टर 2 ने चांगली कामगिरी केली आहे.
म्हणजेच 'KGF - Chapter 2' हा 2022 चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे असं म्हणायला सध्या तरी हरकत नाही. पहिल्या मंगळवारी कमाई करणार्या चित्रपटांची यादी पाहिल्यास, यश स्टारर 'KGF 2' ने 14 वे स्थान मिळविले आहे. मात्र, हा सिनेमा PK, टॉयलेट - एक प्रेम कथा, धूम 3 या सिनेमांना मागे टाकू शकला नाही. तर एअरलिफ्ट, कबीर सिंग आणि तान्हाजी - द अनसंग वॉरियर यांनी इतर काही बिग बॅनर चित्रपटांना मागे टाकले आहे.
KGF - चॅप्टर 2 - 19.14 कोटी रु
काश्मीर फाइल्स - रु. 18 कोटी
RRR - रु. 15.02 कोटी
गंगुबाई काठियावाडी - रु. 10.01 कोटी
बच्चन पांडे - ३.२४ कोटी रुपये
बधाई दो - रु. 1.12 कोटी
राधे श्याम - १.०९ कोटी