KGF Chapter 2 Box Office Collection Day 9: 'KGF 2' ने 750 कोटींचा टप्पा ओलांडला, 'RRR'चा प्रभावही ओसरला

बी टाऊन
Updated Apr 23, 2022 | 15:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

KGF Chapter 2 Box Office Collection Day 9: 'KGF Chapter 2' या चित्रपटाने 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तो आता कोणत्याही भारतीय चित्रपटाचा आठवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने रजनीकांतच्या २.० चित्रपटाच्या लाइफटाईम कलेक्शनलाही मागे टाकले आहे. 

'KGF 2' crosses Rs 750 crore mark, 'RRR' effect waned
केजीएफने ओलांडला 750 कोटींचा टप्पा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'केजीएफ 2' ने 750 कोटींचा टप्पा ओलांडला
  • केजीएफ 2 च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या आठवड्यात 268.63 कोटी रुपयांची कमाई केली
  • केजीएफ 2 च्या कमाईने आरआरआरच्या कमाईवरही परिणाम झालेला आहे.

KGF Chapter 2 Box Office Collection Day 9: शुक्रवारी रिलीज झालेल्या शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर स्टारर 'जर्सी'सिनेमाला रिलीजच्या नवव्या दिवशी 'KGF 2' चित्रपटाने धुऊन काढलं आहे. 'KGF 2' चित्रपटाचा यशाचा रथ दुस-या आठवड्यातही पूर्ण वेगात आहे आणि रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आदल्या दिवसाच्या तुलनेत फारशी घट झालेली नाही. 
 
या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात २६८.६३ कोटी रुपयांची कमाई करून कोणत्याही हिंदी चित्रपटापेक्षा जास्त कमाई करण्याचा विक्रम केला आहे. आता या सिनेमाच्या कमाईने एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईपेक्षा जास्त केली आहे. चित्रपटाची जगभरातील कमाईही 750 कोटींच्या पुढे गेली आहे.

Sanjay Dutt on K.G.F: Chapter 2: Adheera is one of the craziest characters  I have played so far | Tamil Movie News - Times of India

'KGF 2' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात उत्तम कलेक्शन केले. गुरुवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठ दिवसांतच सर्व विक्रम केले. नवव्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारीही चित्रपटाचा व्यवसाय चांगला झाला आहे. सुरुवातीच्या  आकडेवारीनुसार शुक्रवारी या चित्रपटाने सुमारे 19 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

K.G.F: Chapter 2' first review out: "The crown of Kannada cinema is an epic  blockbuster," vouches popular UAE critic | Kannada Movie News - Times of  India

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने शुक्रवारी जवळपास 12 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय 'KGF 2' ने कन्नडमध्ये सुमारे 4 कोटी रुपये, तेलुगूमध्ये 2 कोटी रुपये, तामिळमध्ये 4 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 2 कोटी रुपये कमावले आहेत. अंतिम आकडा येईपर्यंत या आकडेवारीत किंचित तफावत असू शकते.

KGF: Chapter 2' releases across 4500 screens; Yash starrer beats Akshay  Kumar's 'Sooryavanshi' to have widest post-pandemic debut | Hindi Movie  News - Times of India
'केजीएफ चॅप्टर 2' या चित्रपटाच्या स्थिर कमाईमुळे 'आरआरआर' चित्रपटाची चमक कमी झाली आहे. यशच्या चित्रपटाने 'आरआरआर' या चित्रपटाला मागे टाकलं आहे. जर आपण 'RRR' चित्रपटाचा बॉक्स ऑफिस प्रवास पाहिला तर, त्याच्या हिंदी आवृत्तीने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 50 कोटी रुपये, 
रिलीजच्या पाचव्या दिवशी 100 कोटी रुपये कमावले आहेत.नवव्या दिवशी 150 कोटी, रिलीजच्या 17व्या दिवशी 200 कोटी आणि रिलीजच्या 23व्या दिवशी 250 कोटींचा गल्ला पार केला. 'KGF Chapter 2' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात सर्व टप्पे पार केले.

'KGF Chapter 2' या हिंदी चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 53.95 कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 46.79 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.90 कोटी, चौथ्या दिवशी 50.35 कोटी, पाचव्या दिवशी 25.57 कोटी, सहाव्या दिवशी 19.14 कोटी, 16.35 कोटी  रुपयांची कमाई केली आहे. सातव्या दिवशी कोटी आणि आठव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाने 'KGF Chapter 2' हिंदीने सुमारे 14 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच हिंदीमध्ये सुमारे 268.63 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

kgf: KGF: Chapter 2 will be the first Kannada film to screen on IMAX |  Kannada Movie News - Times of India
जगभरातील कलेक्शनच विचार केला तर 'KGF Chapter 2' या चित्रपटाने 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तो आता कोणत्याही भारतीय चित्रपटाचा आठवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने रजनीकांतच्या २.० चित्रपटाच्या लाइफटाईम कलेक्शनलाही मागे टाकले आहे. 
दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाचे कलेक्शन 100 कोटींच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. असे करण्यात चित्रपट यशस्वी ठरला तर बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रमही ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी