KGF 2 Box Office Collection Day 1: थिएटरमध्ये रॉकीचे वादळ, KGF 2 हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे

बी टाऊन
Updated Apr 15, 2022 | 17:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

KGF 2 Box Office Collection Day 1: कन्नड सुपरस्टार यश, संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्या KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी तुफान कमाई केली की हृतिक रोशनच्या वॉर सारखा चित्रपटही केजीएफच्या वादळापुढे तग धरू शकला नाही.

KGF 2 is the biggest opening movie in theaters
केजीएफ 2 ठरला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली
  • केजीएफ 2 पुढे हृतिक रोशनचा वॉर चित्रपटही गारद झाला.
  • चाहत्यांच्या क्रेझमुळे सकाळी सहा आणि सात वाजताचे शो अनेक ठिकाणी चालवले गेले.

KGF 2 Box Office Collection Day 1: कन्नड सुपरस्टार यश, संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्या KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकं तुफान कमाई केली की हृतिक रोशनचा वॉर सारखा चित्रपटही गारद झाला. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. चाहत्यांच्या क्रेझमुळे सकाळी सहा आणि सात वाजताचे शो अनेक ठिकाणी चालवले गेले. या चित्रपटाचे शो बहुतेक राज्यांमध्ये हाऊसफुल्ल होते. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या भव्य रिलीजची योजना आखली होती आणि जगभरातील 10 हजारांहून अधिक स्क्रीनवर तो रिलीज केला होता. KGF 2 ला उत्तर भारतात 4400 हून अधिक, दक्षिण भारतात 2600+, परदेशात 1100 हिंदी आणि 2900 द्वितीय भाषा स्क्रीन मिळाल्या. याशिवाय हा चित्रपट कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज झाला होता.

या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता प्रारंभिक ट्रेंड आले आहेत, हे स्पष्ट आहे की KGF 2 हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनला आहे. 150 कोटी रुपयांपासून बनवलेल्या, KGF 2 ने 'बाहुबली 1', 'बाहुबली 2' आणि 'RRR'सह हृतिक रोशन व्यतिरिक्त सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांसारख्या स्टार्सना धोबीपछाड केले होते. 

पहिल्या दिवशीची कमाई

मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या हिंदी आवृत्त्यांची एकूण कमाई सुमारे 63 कोटी रुपये झाली आहे. सर्व खर्च वजा करूनही 54 कोटींची कमाई झाली आहे. याआधीचा विक्रम हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूरच्या हिंदी, तमिळ आणि तेलुगु रिलीज 'वॉर'च्या नावावर होता, ज्याने पहिल्या दिवशी 53.24 कोटी रुपयांची कमाई केली होती. केजीएफ 2 ने केजीएफचा पहिल्या दिवशीचा रेकॉर्ड मोडला आहे. केजीएफने पहिल्या दिवशी 44.09 कोटींची कमाई केली होती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी