KGF मधला अँड्र्यू मरता मरता वाचला, जिमला जाताना ट्रकने दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर

KGF Actor BS Avinash: यश स्टारर केजीएफमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता बीएस अविनाश यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. त्याचा भीषण रस्ता अपघात झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

KGF Actor Avinash met with an accident, the car was hit hard by the truck, narrowly saved his life
KGF मधला अँड्र्यू मरता मरता वाचला, जिमला जाताना ट्रकने दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर 
थोडं पण कामाचं
  • अभिनेता अविनाशच्या कारचा अपघात झाला,
  • ट्रकने धडक दिल्याने थोडक्यात बचावला
  • कारचा चक्काचूर झाला

KGF Actor BS Avinash: यश स्टारर केजीएफच्या दोन्ही भागांमध्ये अँड्र्यूची भूमिका करणारा अभिनेता बीएस अविनाशचा रस्ता अपघात झाला आहे. बुधवारी (२९ जून) बेंगळुरूमध्ये त्यांची कार एका ट्रकला धडकली. सुदैवाने, अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली नाही. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली असून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. (KGF Actor Avinash met with an accident, the car was hit hard by the truck, narrowly saved his life)

अधिक वाचा : Box Office Report: बॉलिवूडने सहा महिन्यांत 200 कोटी रुपये गमावले, बॉक्स ऑफिसवर 1400 कोटी रुपये कमावले

अविनाशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की बुधवारी सकाळी तो त्याच्या मर्सिडीज-बेंझ कारने जिमला जात होता, पण एका वेगवान ट्रकने त्याच्या कारला धडक दिली त्याने लिहिले, 'देवाच्या दयेने मला दुखापत झाली नाही. फक्त कारचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. कारचा अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मदतीसाठी धावले आणि त्यांनी बीएस अविनाशला कारमधून बाहेर काढले.

अधिक वाचा : Kubbra Sait: Sacred Games मधील 'कुक्कू' 'वन नाईट स्टँड'नंतर झाली होती प्रेग्नंट, मग घेतला मोठा निर्णय

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by B.s. Avinash (@avinashbs)


साऊथ स्टार यशच्या केजीएफ मालिकेत अभिनेता अविनाशने स्थानिक टोळीचा बॉस अँड्र्यूची भूमिका साकारली होती. KGF च्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात त्याची भूमिका मोठी होती. केजीएफचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर अनेक ऑफर्स येऊ लागल्या, असा खुलासाही त्यांनी केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी