Khushi Kapoor: खुशी कपूरचा स्वस्तातला ओव्हरसाइज हुडी

बी टाऊन
Updated Jul 08, 2019 | 23:22 IST

Khushi kapoor airport look: खुशी कपूरनं हल्लीच आपल्या फॅशन सेन्समुळे सर्वांना हैराण केलं. मुंबई एअरपोर्टवर खुशी खूपच सिंपल लूकमध्ये स्पॉट झाली. या लूकमुळे खुशीनं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना वेड लावलं आहे. 

Janvi and khushi kapoor
Khushi Kapoor: खुशी कपूरचा स्वस्तातला ओव्हरसाइज हुडी  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • खुशी कपूरचा एअरपोर्ट लूक घायाळ करणारा
  • खुशी कपूरच्या ओव्हरसाईज हुडीची किंमत खूप कमी
  • खुशी कपूर लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबईः बॉलिवूड अॅक्टर सतत फॅशनसाठी ट्रेंड सेंटर बनत असतात. जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर त्यांचे नवीन फोटो समोर येतात. तेव्हा त्यांचे चाहत्या त्यांचा लूक बघण्यासाठी उत्सुक असतात. केवळ रेड कार्पेटचं नाही तर एक्ट्रेसेसचा जिम लूक, एअरपोर्टवर लूक किंवा कोणाताही कॅज्युअल लूक या सगळ्याच लूकसाठी चाहते दिवाने असतात. अॅक्टरची स्टनिंग स्टाईल नेहमीच हेडलाईन्समध्ये असते. काही दिवसांपूर्वीच सोनम कपूरचा ऑरेन्ज ड्रेस आणि दीपिका पदुकोणचा नियॉन ड्रेस या दोघींनी घातलेल्या ड्रेसवरच्या लूकनं सध्या नवीन ट्रेंड सेट केला आहे. चाहत्यांनी देखील त्यांचा हा लूक आवडला. एवढंच नाही तर न्यूकमर्स जान्हवी कपूर आपल्या लखनवी कुर्ता स्टाईल आणि सारा अली खान रोज गोल्ड शॉर्टपर्यंत इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच फॅशन ट्रेंड सेट केली आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच खुशी कपूरनं सुद्धा आपल्या फॅशन सेन्समुळे सर्वांना हैराण केलं. सोनम कपूरच्या लग्नात घातलेलं सुंदर ट्रेडिशनल आऊटफिटसारखं नाही तर, यावेळी खुशी कपूरनं आपल्या एअरपोर्ट लूकवर खूप कमेंट मिळवल्या आहेत. 

खुशी कपूरला हल्लीच मुंबईच्या एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी खुश खूप सिंपल लूकमध्ये दिसली. यावेळचा खुशीचा सिंपल लूक सर्वांनाच आवडला. खुशी कपूरनं यावेळी सिंपल ओव्हरसाइज हुडी घातली होती. या ब्लॅक कलरच्या ओव्हरसाईज हुडीसोबत खुशी कपूरनं कॉम्फी पॅन्ट घातली होती. खुशीनं आपला एअरपोर्ट लूक पूर्ण करण्यासाठी व्हाईट स्निकर्स आणि गोयार्ड टोटे बॅग कॅरी केली होती. या अटायरला खुशीनं मिनिमल मेकअप आणि स्लिक पोनीटेलसोबत पूर्ण केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Miss K back to bombae #khushikapoor #airportdiaries #astheyfly #bollywood #paparazzi #Kapoorsisters #varinderchawla

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla) on

खुशी कपूर या सिंपल लूकमध्ये स्टनिंग दिसत होती. मात्र या लूकसाठी खुशी कपूरनं लाखो रूपये खर्च केलेत. खुशीनं जो अर्बन आऊटफिटर हुडी कॅरी केली आहे, त्याची किंमत ४९ डॉली म्हणजेच ३,३६६ रूपये आहे. यासोबतच खुशीनं स्टायलिश गोयार्ड टोटे बॅगसाठी २००० डॉलर म्हणजेच १,३७,४०१ रूपये खर्च केले आहेत. जर का तुम्ही खुशी कपूरसारखा लूक कॅरी करत असाल तर ओव्हरसाइज हुडी तो तुम्ही खरेदी करू शकता. मात्र तिच्यासारखी ब्रान्डेड बॅग घेणं थोडं महाग पडेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Two are missing @arjunkapoor @anshulakapoor #khushikapoor #boneykapoor #janhvikapoor #khushijanhvi #family

A post shared by khushi kapoor (@khushi.kapoorr) on

खुशी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. करण जोहर काही दिवसांपूर्वी नो फिल्टर नेहामध्ये खुशीला लॉन्च करण्यासंदर्भात बोलला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#khushibae #khushilo #khushikapoor

A post shared by khushi kapoor (@khushi.kapoorr) on

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Khushi Kapoor: खुशी कपूरचा स्वस्तातला ओव्हरसाइज हुडी Description: Khushi kapoor airport look: खुशी कपूरनं हल्लीच आपल्या फॅशन सेन्समुळे सर्वांना हैराण केलं. मुंबई एअरपोर्टवर खुशी खूपच सिंपल लूकमध्ये स्पॉट झाली. या लूकमुळे खुशीनं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना वेड लावलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles