Kiara Advani Sidharth Malhotra Breakup: 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.हे दोघेही अनेकवेळा रात्री उशिरा एकत्र दिसले आणि सुट्टी साजरी करण्यासाठी अनेक वेळा एकत्र बाहेर गेले.
पण आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात काहीही बरोबर नसल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर येत आहेत. दरम्यान, 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी कियाराने असे काही सांगितले की, ज्याचा संबंध ब्रेकअपच्या बातम्यांशी जोडला जात आहे.
कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'भूल भुलैया 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर लाँचच्या प्रसंगी अभिनेत्रीला एक प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात कियाराने असे म्हटले आहे, ते ऐकल्यावर तुम्हालाही असंच वाटेल की 'दाल मै कुछ काला है'
ट्रेलर लॉन्च दरम्यान, मीडियाने कियाराला विचारले की, असं कोण आहे ज्याला तुम्ही तुमच्या स्वप्नातून किंवा तुमच्या आयुष्यातून विसरायला आवडेल? प्रत्युत्तरात कियारा म्हणाली- 'अजिबात नाही, कारण मी ज्यांना भेटले ते माझ्या आयुष्याशी संबंधित होते. त्यामुळे मला कोणाला विसरायचे नाही. कियाराने या प्रश्नाचे उत्तर देताच तिच्या शेजारी बसलेला कार्तिक आधी कॅमेराकडे पाहू लागला आणि नंतर खाली पाहू लागला.
बऱ्याच दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्राने कियारा अडवाणीची कोणतीही पोस्ट लाईक केलेली नाही. त्यामुळे या बातम्या जोरात येत आहेत. ई टाईम्सच्या वृत्तानुसार, सूत्रांवर विश्वास ठेवला तर, 'या दोघांमध्ये काय झाले हे कोणालाच माहीत नाही, मात्र, आजकाल लोक एकमेकांना खूप लवकर कंटाळतात.'